MNS News: भाजप उमेदवारावर वक्तव्य करणं भोवलं, मनसे पदाधिकाऱ्यावर मोठी कारवाई

Lok Sabha News 2024 : भाजप उमेदवाराविरोधात मनसेच्या पदाधिकाऱ्याने वक्तव्य केल्याने त्याची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
Nitin Bhutare, Sujay Vikhe
Nitin Bhutare, Sujay VikheSarkarnama
Published on
Updated on

MNS BJP Alliance: मनसेचा महायुतीत प्रवेश करण्यासाठी मनसेच्या आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहेत. या चर्चा सुरू असतानाच भाजप उमेदवाराविरोधात मनसेच्या पदाधिकाऱ्याने वक्तव्य केल्याने त्याची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. महायुतीत अशा कारवाईची महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना ठरली आहे. मनसेचे नगरमधील डॅशिंग नेते नितीन भुतारे (Nitin Bhutare) यांना जिल्हा सचिव पदावरून हटवले आहे. भाजप उमेदवार खासदार सुजय विखे यांच्याविरोधात वक्तव्य केल्याने त्यांच्यावर मनसेने (MNS) ही कारवाई केली आहे. 'ही कारवाई म्हणजे, माझे प्रमोशन समजतो', अशी खोचक प्रतिक्रिया नितीन भुतारे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना दिली.

महायुतीतील भाजपने (BJP) सुरुवातीला पहिली मतदार यादी जाहीर केली. या यादीत महाराष्ट्रातील पहिल्या 20 उमेदवारांमध्ये नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. उमेदवारीनंतर अवघ्या दोन दिवसांत मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे (Nitin Bhutare) यांनी खासदार विखेंवर निशाणा साधला. कोणत्याही सर्वसामान्य नागरिकाने थेट खासदार विखेंशी दूरध्वनीवर संपर्क केल्याचे दाखवून द्या आणि एक हजार रुपये बक्षीस घेऊन जा. खासदार विखे हे सर्वसामान्य नागरिकांना भेटत नाहीत. त्यांच्या भेटीसाठी खूप प्रयत्न करावे लागतात. स्वीय सहायकांचे अडथळे खूप येतात. तरीदेखील संपर्क होईल की नाही, हे सांगता येत नाही, अशी टीका नितीन भुतारे यांनी केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बक्षिसाची ही योजना जाहीर करताना नितीन भुतारे यांनी तसे स्टीकर तयार केले होते. काही ठिकाणी स्टीकर चिटकवण्यात आले होते. या योजनेला काही काल मर्यादा घालून दिली होती. अजून तरी कोणीही बक्षिसासाठी दावा केलेला नाही. नितीन भुतारे यांनी ही बक्षिसाची योजना जाहीर केली, तेव्हा भाजप महायुतीत मनसेच्या युतीच्या चर्चादेखील नव्हती. आता चर्चा सुरू झाली असली, तरी निर्णय झालेला नाही. याबाबत मनसेचे (MNS) जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी भुतारे पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी यांना विचारात न घेता वक्तव्य करतात. याबाबत वरिष्ठांकडे तक्रारी होत्या. त्यामुळे त्यांना पक्षातील पदावरून हटवले असून, त्यांच्या जागी संजय शेळके यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती दिली.

Nitin Bhutare, Sujay Vikhe
Sharad Pawar News: मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवारांची टोलेबाजी; म्हणाले, माझं बोट धरून राजकारणात आले असते तर...

पक्षाने केलेल्या कारवाईवर नितीन भुतारे म्हणाले, "ही कारवाई म्हणजे, माझे प्रमोशन समजतो. मी पक्ष सोडलेला नाही. मला पक्षाने पदावरून हटवले आहे. खरे बोललो आणि त्यावर कृती केली म्हणून भाजपच्या नेत्याला झोंबली. यामुळे मी खरे असल्याचे सिद्ध झाले आहे. आता सर्वसामान्य जनतेने ठरवावे, काय करायचे ते! आणि वेळदेखील साधून आलेली आहे". मी राज ठाकरे यांच्याबरोबर आजही आहे."

(Edited By Jagdish Patil)

R

Nitin Bhutare, Sujay Vikhe
Aaditya Thackeray News : चहल मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात; आदित्य ठाकरे म्हणतात, "मर्जीतल्या कंत्राटदारांना..."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com