Aaditya Thackeray News : चहल मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात; आदित्य ठाकरे म्हणतात, "मर्जीतल्या कंत्राटदारांना..."

Aaditya Thackeray on eknath Shinde iqbal chahal : चहल यांच्या बदलीनंतर आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं आहे.
eknath shinde iqbal singh chahal aaditya thackeray
eknath shinde iqbal singh chahal aaditya thackeraysarkarnam
Published on
Updated on

Mumbai News : मुंबई पालिका आयुक्तपदावरून बदली करण्यात आलेले इक्बालसिंह चहल यांची मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्याशिवाय मुंबई पालिकेतील अतिरिक्त आयुक्तपदावरून बदली झालेले पी. वेलरायू यांची सामाजिक न्याय विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चहल यांच्या बदलीनंतर आमदार आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांना लक्ष्य केलं आहे.

चहल यांची मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त सचिव या पदावर नियुक्तीचा आदेश शुक्रवारी काढण्यात आला. या पदावरील भूषण गगराणी यांची मुंबई पालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली होती. वेलरासू यांची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती होईल, अशी अटकळ बांधण्यात येत होती. पण, वेलरासू यांची सामाजिक न्याय विभागाच्या सचिवपदी बदली करण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यातच ट्विटच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंनी ( Aaditya Thackeray ) मुख्यमंत्र्यांसह चहल यांच्यावर टीका केली आहे. "मी 2 दिवसांपूर्वी भाकीत केलं होतं, अगदी तसंच घडलंय... मुंबई महापालिकेचे भ्रष्ट आयुक्त आता मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्त झालेत. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना मदत करण्यासाठी या भ्रष्ट माजी आयुक्तांची विशेष नियुक्त झाली. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतल्या कंत्राटदारांना मुंबई लुटण्यासाठी मदत केल्याबद्दल मिळालेलं हे बक्षीस आहे!," असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केला आहे.

eknath shinde iqbal singh chahal aaditya thackeray
Eknath Shinde Vs Aaditya Thackeray : 'ठाणे तर लांबच आहे, कल्याणमध्ये लढा!'; शिंदे गटाचे आदित्य ठाकरेंना चॅलेंज

दरम्यान, चहल हे गेले पावणेचार वर्षांहून अधिक काळ मुंबई पालिकेत आयुक्त म्हणून नियुक्त होते. लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कार्यकाळ पूर्ण केलेल्या किंवा मूळ जिल्ह्यात नियुक्ती असलेल्या महापालिका अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं सरकारला दिले होते.

मात्र, याकडे सरकारकडून कानाडोळा करण्यात आल्याचं बोललं जात होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर निवडणूक आयोगानं बदलीसाठी पात्र असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदलण्यासाठी प्रक्रिया सुरू केली. त्यानुसार 20 मार्च 2024 रोजी निवडणूक आयोगानं चहल यांना पालिका आयुक्तपदावरून दूर केलं होतं.

R

eknath shinde iqbal singh chahal aaditya thackeray
Aaditya Thackeray News : 'बावनकुळेंचे चीनशी जवळचे संबंध, असल्याने त्यांना...' ; आदित्य ठाकरेंनी लगावला टोला!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com