Nilesh Lanke On Sujay Vikhe : विखेंचा 'तो' बालिशपणा ठरेल; खासदार लंकेंचा टोला

Nilesh Lanke comments on Sujay Vikhe : भाजप उमेदवार सुजय विखे यांची ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीची केंद्रीय निवडणूक आयोगाने मागणी मान्य केली आहे. खासदार नीलेश लंके यांनी यावर हा बालिशपणा ठरेल, अशी टीका केली आहे.
Nilesh Lanke On Sujay Vikhe
Nilesh Lanke On Sujay VikheSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : भाजपचे उमेदवार सुजय विखे यांची ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी म्हणजे, बालिशपणा आहे, असा टोला खासदार नीलेश लंके यांनी लगावला. एवढी मोठी निवडणूक यंत्रणा राबली.

महसूल विभाग कार्यरत होता. विशेष म्हणजे, महसूलचा कारभार त्यांच्या वडिलांच्या राधाकृष्ण विखे यांच्या हाती होता. तरी आक्षेप घेणं म्हणजे, त्यांच्याच पक्षाला घरचा आहे, असे नीलेश लंके यांनी म्हटले आहे.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपचे (BJP) उमेदवार सुजयव विखे यांचा नीलेश लंके यांनी पराभव केला. ही लढत लक्षवेधी ठरली. नीलेश लंके यांनी सुरवातीला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाबरोबर होते. परंतु त्यांनी एेनवेळी राष्ट्रवादी काँगेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात उडी घेत, खासदारकी लढवली. विखे आणि लंके यांच्यात थेट लढत असल्याने ती लक्षवेधी ठरली. या निवडणुकीत विखेंविरुद्ध सर्व विखे विरोधक, असे या लढतीचे चित्र होते.

Nilesh Lanke On Sujay Vikhe
Sujay Vikhe : सुजय विखेंच्या मागणीला ग्रीन सिग्नल; निष्कर्षाकडे लक्ष अन् धाकधूक वाढली

अटीतटीच्या लढतीत सुजय विखे यांचा पराभव झाला. लंके यांचा 29 हजार मतांनी विजयी झाले. हा पराभव विखे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे. सुजय विखे यांनी लगेचच अहमदनगर जिल्हा प्रशासनामार्फत राज्य निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम (EVM) आणि व्हीव्हीपॅट मशीन पडताळणीची मागणी केली. केंद्रीय निवडणूक आयोगाने ही मागणी मान्य केली असून, जिल्हा प्रशासन आता मतदान यंत्रांचे मॉकपोल घेण्याची तयारी करत आहे. सुजय विखे यांची मागणी मान्य होताच, खासदार नीलेश लंके यांनी यावरून विखेंवर निशाणा साधला.

Nilesh Lanke On Sujay Vikhe
IAS Pooja Khedkar : पूजा खेडकर यांचे नॉन क्रिमीलेअर वादात; आयकर विभागाकडून उत्पन्नाच्या कुंडलिचा शोध सुरू

नीलेश लंके म्हणाले, "ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन पडताळणीची मागणी करणे म्हणजे बालिशपणा आहे. वास्तविक लोकसभा निवडणुकीत अहमदनगरचे जिल्हाधिकारी हे निवडणूक निर्णय अधिकारी होते". सुजय विखे यांचे वडील महसूलमंत्री असल्याने त्यांचाच आखत्यारीतील महसूल विभागाच्या हातात निवडणुकीच्या सर्व कारभार होता. तरी देखील त्यांनी, असा आक्षेप घेणे म्हणजे, त्यांच्याच पक्षाला घरचा आहेर आहे, असेही लंके यांनी म्हटले.

तर विरोधकांचा मशीनबाबतचा आरोप खरा ठरेल

माझ्या मतदारसंघात मी बारकाईने पाहिलेले आहे आणि त्याचा आम्ही अभ्यास केला आहे. माझ्या पारनेर विधानसभा मतदासंघातील ज्या 40 मतदान केंद्रांवरील मशीनची पडताळणी होणार आहे. त्यात एक मताचाही फरक पडणार नाही. काही होणार नाही, तर त्यावर चर्चा कशाला करायची? पण विखेंना आता समाजापुढे जायचे आहे, तर कसे जायचे? समाजाला हे सांगू शकत नाही की, आम्ही आमच्या 'गुणां'मुळे पराभूत झालो. त्यासाठी मशीनमध्ये गडबड आहे, मशीन मॅनेज केल्या आहेत, हे सांगण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. मात्र पडताळणीचा हा निकाल देशात जाणार आहे. त्यात काही गडबड आढळल्यास विरोधी पक्षांकडून 'ईव्हीएम'मध्ये गडबड होते, या आरोप खरा होईल, असे देखील लंके यांनी म्हटले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com