Nagar Urban Bank Fraud : राजेंद्र डोळेकडून कुवत नसलेल्या फर्मला कर्ज वाटप

Bank Officer Arrested In Nagar Urban Bank Fraud : नगर अर्बन बँकेच्या 291 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी बँकेतील सहायक मुख्य व्यवस्थापक राजेंद्र डोळे याला नगर पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला 19 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
Nagar Urban cooperative bank
Nagar Urban cooperative bankSarkarnama

Nagar Urban Bank Fraud : नगर अर्बन बँकेच्या 291 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी बँकेचे सातारा जिल्ह्यातील अधिकारी राजेंद्र केशव डोळे याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला 19 जूनपर्यंत पोलिस कोठडी ठेवण्याचा आदेश दिला आहे. नगर पोलिस दलातील आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी ही कारवाई केली. या गु्न्ह्यात आतापर्यंत 12 जणांना अटक झाली आहे.

राजेंद्र डोळे याला पुण्यातून आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. नगर अर्बन बँकेच्या फाॅरेन्सिक आॅडिटच्या अहवालानुसार पोलिसांकडून संशयितांची चौकशी सुरू आहे. काही संचालक, अधिकारी, कर्जदार, अशी एकूण 12 जणांना अटक झाली आहे. या घोटाळ्यात इतर अधिकाऱ्यांचे जबाब देखील नोंदवण्यात आले आहेत.

राजेंद्र डोळे याच्यावर आर्थिक गु्न्हे शाखा पोलिसांना संशय होता. राजेंद्र डोळे हा बँकेच्या कर्जविभागात अधिकारी म्हणून कार्यरत होता. याशिवाय बँकेत अपहार झाल्याच्या कालावधीत सहायक मुख्य व्यवस्थापक या पदावर कार्यरत होता.

पुष्कराज ट्रेडिंग, जिजाई मिल्क प्रोडक्स फर्म, एस. एस. साई डेव्हलपर्स, तुकाराम एखंडे, सुरेश इंडस्ट्रीज, स्वप्नील इंडस्ट्रीज, के. के. विद्युत, श्री गणेश एजन्सी, नयन एंटरप्रायजेस, यशराज वास्तू, नागेश पाटील आणि इतर कर्जदारांना कुवत नसताना तसेच कर्जास पुरेपुर तारण नसताना कर्जप्रकरणांना शिफारस दिली. बँकेतील रकमेचा अपहार (Fraud) केला. तसेच राजेंद्र डोळे याचे अर्बन बँकेतील बचत खात्यात मोठ्या स्वरुपात रोख रकमा जमा करण्यात आल्या आहेत. या रकमांची चौकशीसाठी पोलिसांनी न्यायालयाकडे राजेंद्र डोळे याच्या कोठडीची मागणी केली.

Nagar Urban cooperative bank
BJP On Nilesh Lanke : नीलेश लंकेंचा गज्या मारणेशी 'ऋणानुबंध' दिसला; वळणाचं पाणी वळणावर जातं...

पोलिसांना त्यांच्यावर पहिल्यापासून संशय होता. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर अटक केली. अटकेनंतर राजेंद्र डोळे याला पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला 19 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात आदेश दिला. दरम्यान, या गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपींनी जामिनासाठी तर, काहींनी अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी अटकपूर्व जामीन दाखल केले आहेत. यावर न्यायालयात 18 जूनला सुनावणी होणार आहे.

Nagar Urban cooperative bank
Kishore Darade : शिक्षकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदार दराडेंविरुद्ध दाखल गुन्ह्यांची चर्चा; हरकत अन्...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com