Kishore Darade : शिक्षकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदार दराडेंविरुद्ध दाखल गुन्ह्यांची चर्चा; हरकत अन्...

Nashik Teachers Constituency Offences against MLA Kishore Darade : नाशिक शिक्षक विधानपरिषद निवडणुकीत अर्ज छाननी 38 पैकी दोन जणांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले. आमदार किशोर दराडे यांनी शपथपत्रात गुन्ह्यांची माहिती लपवली असल्याची हरकत कायदेशीर प्रक्रियेनंतर फेटाळण्यात आली.
Kishore Darade
Kishore Daradesarkarnama

Nashik Teachers Constituency Election 2024 : नाशिक शिक्षक विधानपरिषदेची निवडणुकीला टोकदार वळण लागले आहे. ठाकरे शिवसेना, शिंदे शिवसेना आणि काँग्रेसने उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. यात आमदार किशोर दराडे यांच्याविरोधात दाखल गुन्ह्यांचा मुद्दा चर्चेत आला आहे.

निवडणुकीसाठी दाखल अर्जांची काल छाननी झाली. यात आमदार किशोर दराडे (शिवसेना शिंदे गट) यांनी त्यांच्याविरोधात दाखल गुन्ह्यांची माहिती शपथपत्रात लपवल्याची हरकत घेण्यात आली. आमदार किशोर दराडे यांनी मात्र दाखल गुन्ह्यांवर स्पष्ट भूमिका मांडली.

शिवसेना (Shiv Sena) एकनाथ शिंदे गटाचे आमदार किशोर दराडे यांनी शपथपत्रात त्यांच्यावर दाखल गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आक्षेप उमेदवार रणजित बोठे यांचे प्रतिनिधी यांनी घेतला होता.

आमदार दराडे यांनी शपथपत्रात गुन्ह्यांची पूर्ण माहिती दिली नाही. त्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरवावी, अशी मागणी होती. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या हरकतीनुसार संपूर्ण छाननी केली. या हरकतीमुळे आमदार दराडे यांच्या गटात अस्वस्थता पसरली होती.

Kishore Darade
Nashik Teacher Constituency : नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतील उमेदवार किशोर दराडेंचे अपहरण की बेपत्ता?

आमदार किशोर दराडे यांच्याविरोधात तीन गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती मिळते. यात 2015, 2020 आणि 2023 मध्ये हे तीन गुन्हे असल्याचे सांगितले जाते. यात 2015 मध्ये फसवणूक, कट करणे, खोट्या नोंदी करणे, कागदपत्रांचे बनावटीकरण, बनावट कागदपत्रांचा वापर करणे, बनावट कागदपत्र खरे म्हणून भासवणे आणि फौजदारी कट करणे या कलमांनुसार गु्न्हा दाखल आहे.

तसेच 2020 मध्ये फसवणूक केल्याचा खटला नाशिक न्यायालयात दाखल आहे. 2023 मध्ये फसवणूक केल्याच्या आरोपावरून फौजदारी प्रक्रिया संहितानुसार चौकशीची मागणी आहे.

यातील 2020 आणि 2023 मध्ये दाखल गुन्ह्यांची माहिती लपवण्याचा प्रकार झाल्याची हरकत घेण्यात आली होती. या तक्रारीची कायदेशीर तपासणी केल्यानंतर निर्णय निवडणूक अधिकारी यांनी फेटाळली. या आदेशानंतर आमदार दराडे यांचा गट काहीसा स्वस्थ झाला. अर्ज माघारी घेण्याची मुदत उद्या 12 जूनपर्यंत आहे. त्यावेळी निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. निवडणुकीचे निरीक्षक म्हणून विक्रम कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आमदार किशोर दराडे म्हणाले, "माझी बदनामी करण्यासाठी विरोधक खूप आदळआपट करत आहेत. माझ्यावर दाखल गुन्ह्यांची सर्व माहिती शपथपत्रात दिली आहे. बदनामी करणे हा त्यांचा पारंपारिक छंद आहे. माझ्या नावाशी साधर्म्य असलेल्या व्यक्ती समोर उभे केले जात आहे. षडयंत्र करून निवडणूक लढण्याचे काम केले जात आहे. याला शिक्षक मतदार कोणीही भीक घालणार नाही".

Kishore Darade
Teachers constituency 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-आमदार किशोर दराडेंकडून आचारसंहिता धाब्यावर?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com