MP Sujay Vikhe: खासदार म्हणून आले अन् डॉक्टर म्हणून कामाला लागले; डॉ.सुजय विखेंनी केली आरोग्य तपासणी

Ahmednagar Politics: खासदार विखे यांनी स्टेटोस्कोप कानाला लावत आरोग्य तपासणी केली
MP Sujay Vikhe
MP Sujay VikheSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News: लोकप्रतिनिधी आणि नेता म्हंटले की भाषणबाजी ही आलीच. एखाद्या कार्यक्रमाला नेते खूप असतील तर विचारायलाच नको. मात्र, प्रसंगावधान राखून केलेली एखादी कृती ही एक वेगळा रंग देऊन जाते. अशाच पत्रकारांच्या आरोग्य तपासणी शिबिराला लोकप्रतिनिधी सोबतच विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले. कार्यक्रम छोटेखानी स्वरूपाचा असला तरी पत्रकार आरोग्य तपासणीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अनेकजण आपल्या कुटुंबातील सदस्यांसह आरोग्य तपासणी करण्यासाठी आवर्जून उपस्थित होते. अशात नगर दक्षिणेचे खासदार डॉ.सुजय विखे यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. मराठी पत्रकार परिषद नगर जिल्हा शाखेच्यावतीने 85 व्या वर्धापनदिनानिमित्त पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरासाठी आलेले सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी हजेरी लावली.

यावेळी छोटेखानी भाषणे नेते मंडळींनी केली. यानंतर पत्रकारांची आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली. यावेळी खासदार म्हणून जरी आमंत्रित केले असले तरी सुजय विखे यांच्यातील डॉक्टर दिसून आले.

MP Sujay Vikhe
Sangram Jagtap vs Sujay Vikhe : "सेमीफायनल"च्या निकालाने सुजय-संग्राम यांचे चेहरे खुलले... ये रिश्ता क्या कहलाता है

विखे यांनी स्टेटोस्कोप कानाला लावत स्वतः पत्रकारांची आरोग्य तपासणी सुरू केली. यावेळी त्यांनी पत्रकारांना काय त्रास जाणवतो ? कधी पासून ? सध्या काय उपचार घेतले ? असे प्रश्न विचारत असलेल्या त्रासावर काय उपचार योग्य राहतील याचे वैयक्तिक मार्गदर्शन केले. तर सुपरफास्ट बातम्यांच्या युगात पत्रकारांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करुन, पत्रकारांसाठी राबविण्यात आलेल्या आरोग्य शिबिराचे कौतुक केले.

मराठी पत्रकार परिषदेने आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात मोफत चष्मे वाटप कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले.

आमदार संग्राम जगताप, मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस मन्सूरभाई शेख, डिजिटल मीडियाचे आफताब शेख, सामाजिक कार्यकर्ते हरजितसिंह वधवा, नाशिक विभागीय अधिस्विकृती समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सुधीर लंके, सदस्य विजयसिंह होलम, ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल लांडगे, डॉ.इमरान शेख आदींसह पत्रकार, वृत्तपत्र छायाचित्रकार व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Edited by- Ganesh Thombare)

MP Sujay Vikhe
Ahmednagar News : रस्त्यासाठी आणलेली वाळू भाजपच्या नेत्याने चोरली ? गुन्हा मागे घेण्यासाठी काढला मोर्चा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com