Sangram Jagtap vs Sujay Vikhe : "सेमीफायनल"च्या निकालाने सुजय-संग्राम यांचे चेहरे खुलले... ये रिश्ता क्या कहलाता है

Assembly Election Results : नगरमध्ये जल्लोष... एकमेकांना भरवले पेढे
sujay vikhe
sujay vikhe sarkarnama
Published on
Updated on

Nagar News : राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो आणि शत्रूही नसतो. अगदी हेच चित्र गेल्या काही दिवसांपासून नगरमध्ये पाहिला मिळत आहे. पाच राज्यांत भाजपने मिळवलेल्या विजयानंतर नगर दक्षिणेच्या लोकसभा निवडणुकीत एकमेकांच्या समोर ठाकलेले सुजय विखे आणि संग्राम जगताप यांनी एकमेकांना पेढे भरवले. हा फोटो सोशल मीडियावर आल्यानंतर मतदारसंघातील नागरिकांमध्ये चर्चांना उधाण आले आहे.

तेलंगणा वगळता राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपने बाजी मारताच नगर शहरात भाजपने खासदार सुजय विखे यांच्या उपस्थितीत जोरदार सेलिब्रेशन केले. विशेष म्हणजे या सेलिब्रेशनमध्ये महायुतीत आलेले राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप ही सहभागी झाले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

sujay vikhe
Udayanraje Breaking News : जरांगे पाटलांच्या भेटीसाठी निघालेल्या उदयनराजेंचा दौरा तडकाफडकी रद्द; चर्चांना उधाण

या दोघांनी एकमेकांना पेढे भरवत गळाभेट घेत विजयाचा आनंद साजरा केला. हे दोन्ही नेते आणि त्यांचे कार्यकर्ते 2019 च्या लोकसभा निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकले होते. अगदी प्रचारात एकमेकांवर धनशक्ती विरुद्ध गुंडगिरी अशा आरोपाच्या फैरीदेखील झडल्या होत्या.

2019 ला सुजय विखेंना लोकसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी मोठा संघर्ष करावा लागला. आघाडीत जागा राष्ट्रवादीकडे असल्याने काँग्रेस पक्ष सुजय विखे यांना उमेदवारी देऊ शकत नव्हता. राष्ट्रवादीने त्यांना तिकिटासाठी खूप झुलवत ठेवले असे बोलले जाते. काँग्रेससह राष्ट्रवादीकडून ही उमेदवारीची आशा संपुष्टात येताच सुजय विखे यांनी अपेक्षेप्रमाणे भाजपची वाट धरली आणि उमेदवारी मिळवली. भाजपनेही तत्कालीन विद्यमान खासदार आणि केंद्रात राज्यमंत्री राहिलेल्या (दिवंगत) दिलीप गांधी यांचे तिकीट कापून विखे यांना आपले उमेदवार बनवले.

sujay vikhe
PM Modi : या खासदारांना येत्या 14 दिवसांत द्यावा लागणार राजीनामा

त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आपला हुकमाचा एक्का म्हणून नगरचे तरुण आमदार असलेले संग्राम जगताप यांना मोठ्या विश्वासाने मैदानात उतरवले. राष्ट्रवादीची दोन आमदारांसह मतदारसंघात ताकत असताना संग्राम यांनी सुजय विखेंसमोर मोठी लढत उभी केली होती. मात्र, सुजय विखे यांनी विजय आपल्या पदरात पाडून घेतला. सुजय विखे यांना तब्बल 7 लाख 04 हजार 660 मते मिळाली, तर राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांना 4 लाख 23 हजार 186 मतांवर समाधान मानावं लागलं. विशेष म्हणजे नगर शहराचे विद्यमान आमदार असलेले संग्राम जगताप 53 हजारावर मतांनी पिछाडीवर पडले. निकालानंतर संग्राम यांनी धनशक्तीचा वापर आणि मोदी चेहऱ्यावर सुजय विखे निवडून आल्याची टीका केली.

sujay vikhe
Prakash Ambedkar News : राजकीय पंडित, ज्याेतिषांना मोदींनी झोपवलं; का हारलो याचा काँग्रेसने विचार करावा...

लोकसभेला सुजय विखेंकडून पराभूत झालेले संग्राम जगताप काहीच महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे (दिवंगत) अनिल राठोड यांचा 11 हजार मतांनी पराभव करत पुन्हा निवडून आले. लोकसभेला पिछाडीवर पडलेले संग्राम विधानसभेला मात्र आरामात निवडून येतात याचीही चर्चा त्यावेळी झाली. दरम्यान, शहरातील उड्डाणपूल आणि इतर विकासकामांच्या निमित्ताने सुजय-संग्राम यांचे एकत्रित येणे यांच्याही बातम्या ओघानेच चर्चेत राहिल्या. लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहिल्या गेलेल्या पाच राज्यांच्या निकालानंतर भाजपला मिळालेल्या यशाच्या जल्लोषात संग्राम जगताप "दिलं से" सहभागी झालेले दिसून आले. त्यामुळे आता 2024 साठी कुठेतरी या दोघांना "फिल गुड" वाटत असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

sujay vikhe
Chhattisgarh Assembly Election 2023 Result : छत्तीसगडमध्ये काँग्रेसला `पनौती`, नऊ मंत्री पिछाडीवर...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com