Ahmednagar Politics: आमदार गडाखांना बाळासाहेब मुरकुटे घेरणार ?; शनैश्वर देवस्थानचा विषय बावनकुळे अधिवेशनात मांडणार

Shankarrao Gadakh VS Balasaheb Murkute: शनैश्वर देवस्थानवर गैरव्यवहाराचा आरोप करत उपोषणाला बसलेले ऋषिकेश शेटे यांच्या आंदोलनाची दखल चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली.
Shankarrao Gadakh and Balasaheb Murkute:
Shankarrao Gadakh and Balasaheb Murkute:Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News: नेवासे तालुक्यातील शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानवर गैरव्यवहाराचा आरोप करत बेमुदत उपोषणाला बसलेले कार्यकर्ते ऋषिकेश शेटे यांच्या आंदोलनाची दखल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी घेतली आहे. बावनकुळे आणि मंत्री कराड यांनी आंदोलनाची घेतलेली दखल म्हणजेच, शिवसेनेचे माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh) यांना घेरण्याची रणनीती असल्याच्या चर्चेला पेव फुटले आहे.

सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश शेटे यांनी शनैश्वर देवस्थानावर गंभीर आरोप करत चौकशी करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी सायंकाळपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) या काल शनिशिंगणापूर येथे दौऱ्यावर होत्या. शनी मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर त्या पुढे रवाना झाल्या. यानंतर ऋषिकेश शेटे यांनी सायंकाळी बेमुदत उपोषण सुरू केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shankarrao Gadakh and Balasaheb Murkute:
Ajit Pawar Vs Jayant Patil : सोळंकेंना कार्याध्यक्षपदाचा शब्द मी नव्हे, अजितदादांनी दिला होता; जयंत पाटलांचा पलटवार

भाजपचे (BJP) माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे (Balasaheb Murkute) अशोक टेमक, सरपंच भरत बेल्हेकर, माजी सरपंच बंडू शिंदे, सतीष गडाख, संदीप कुसळकर यांच्यासह भाजप कार्यकर्ते यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. शनैश्वर देवस्थानात सुरू असलेल्या आर्थिक घोटाळ्याची चौकशी, नोकर भरतीची चौकशी, विश्वस्त मंडळ बरखास्त करून ते सरकार जमा करावे, या प्रमुख मागण्या सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश शेटे यांनी केल्या.

या आंदोलनाची दखल चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री भागवत कराड यांनी घेतली. या वेळी नगर उत्तरचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल लंके उपस्थित होते. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या पुढाकारातून बावनकुळे आणि मंत्री कराड यांनी आज उपोषणकर्ते शेटे यांची भेट घेतली. बावनकुळे आणि मंत्री कराड यांनी शेटे यांच्या मागण्यांचे निवेदनाचा अभ्यास केला.

यानंतर बावनकुळे यांनी आंदोलनावर जाहीर केलेल्या भूमिकेमुळे नेवासे तालुक्यातील राजकारण तापले आहे. बावनकुळे म्हणाले,"ऋषिकेश शेटे या उपोषणकर्त्याचा हेतू शुद्ध आहे. त्यांच्या या निवेदनावर सरकारशी बोलणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी यावर चर्चा करणार असून, नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात यावर बैठक घ्यायला सांगेल. देवस्थानातील गैरव्यवहाराच्या आरोपांवर माझे लक्ष असणार आहे. देवस्थानला भविक शुद्ध हेतूने दान देतात. या दानाचा खर्च चांगल्यासाठी व्हावा. त्याचा गैरवापर होऊ नये, यासाठी माझी संपूर्ण मदत असणार आहे."

Shankarrao Gadakh and Balasaheb Murkute:
President Droupadi Murmu : राष्ट्रपती मुर्मू यांचा शनीला तैलाभिषेक अन् चौथऱ्याच्या वादाला उजाळा !

बावनकुळे आणि मंत्री कराड यांनी शनैश्वर देवस्थानविषयी असलेल्या आंदोलनाची दखल घेणे म्हणजे, शिवसेनेचे माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांना घेरण्यासाठी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केलेली पेरणी असल्याची चर्चा रंगली आहे.

शनैश्वर देवस्थानचा विषय नागपूर हिवाळी अधिवेशनात घेऊन जाणार असल्याच्या बावनकुळे यांच्या घोषणेची दखल शंकरराव गडाख कशी घेतात आणि त्याला कसे उत्तर देतात, याकडे आता नेवासेकरांसह नगर जिल्ह्यातील अनेकांचे लक्ष लागले आहे.

(Edited By - Ganesh Thombare)

Shankarrao Gadakh and Balasaheb Murkute:
Vivek Kolhe Statement : आमच्याच पाठपुराव्यामुळे 'एमआयडीसी'ला मंजुरी; विवेक कोल्हेंच्या दाव्याने राजकारण तापले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com