President Droupadi Murmu : राष्ट्रपती मुर्मू यांचा शनीला तैलाभिषेक अन् चौथऱ्याच्या वादाला उजाळा !

President Droupadi Murmu visit to Shani Shingnapur : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिशिंगणापूर येथे शनैश्वर मूर्तीचे दर्शन घेतले.
President Droupadi Murmu
President Droupadi MurmuSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिशिंगणापूर येथे शनैश्वर मूर्तीला चौथऱ्यावर जाऊन तैलाभिषेक केला. शनैश्वर मूर्तीला चौथऱ्यावर जाऊन तैलाभिषेक घालणाऱ्या मुर्मू या देशातील पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. काही वर्षांपूर्वी शनी चौथऱ्यावर जाण्यास महिलांना प्रवेश नव्हता. तो मिळावा यासाठी खूप संघर्ष करावा लागला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चौथऱ्यावर जाऊन तैलाभिषेक केल्याने जुन्या संघर्षाला उजाळा मिळाला आहे.

शनिशिंगणापूर येथील शनैश्वर मूर्ती असलेल्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेशबंदी होती. तशी जुनी परंपरा. 28 नोव्हेंबर 2015 रोजी एका महिलेने चौथऱ्यावर जाऊन शनी मूर्तीला तैलाभिषेक केला. या महिलेने 400 वर्षांची परंपरा मोडीत काढली. या घटनेनंतर सात सुरक्षारक्षकांवर शनैश्वर देवस्थानकडून कारवाई करण्यात आली. ही कारवाई महिलेने शनी मूर्ती असलेल्या चौथऱ्यावर जाऊन तैलाभिषेक केल्याने झाल्याची माहिती समोर आल्यावर खळबळ उडाली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

President Droupadi Murmu
President Draupadi Murmu : राष्ट्रपतींच्या जेवणाचा मेनू, मटकी-वरणभात आणि करडईची भाजी

शनी मूर्तीच्या चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेणाऱ्या महिलेचे कौतुक होऊ लागले. ही एक सामाजिक क्रांती असल्याचे बोलले जाऊ लागले. संबंधित महिलेवर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच दुसरीकडे ग्रामस्थांनी निषेध सभा घेतल्या. शनी मूर्तीला दुग्धाभिषेक करून शुद्धिकरणाचा घाट घातला. शनी चौथऱ्यावर महिलांना प्रवेशबंदीवरून राज्यात वाद सुरू झाला.

भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यावरून आक्रमक झाल्या. यावरून न्यायालयीन लढ्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या लढ्याला यश आले. न्यायालयात प्रकरण गेले. न्यायालयाने जिथे पुरुषांना प्रवेश मिळतो, तिथे महिलांनाही प्रवेश मिळायलाच हवा, असे ठणकावले. मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला धारेवर धरले. भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले. राज्य सरकारने जिथे पुरुषांना प्रवेश आहे, तिथे महिलांनाही प्रवेश मिळायला हवा, अशीच भूमिका घेतली.

मात्र, न्यायालयाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीत कमतरता दिसत होती. शनी मंदिरातील चौथरा प्रवेशासाठी भूमाता ब्रिगेडने लढा दिला. शनिशिंगणापुरात जाऊन, महिलांसोबत तृप्ती देसाईंनी चौथरा चढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, गावकऱ्यांचा प्रचंड विरोध झाला. त्यांनी हा लढा चालूच ठेवला. दरम्यान, आठ एप्रिल 2016 मध्ये पाडव्याच्या मुहूर्तावर शनी चौथऱ्यावर कोणालाही प्रवेशबंदी करणार नसल्याची घोषणा मंदिर समितीच्या विश्वस्तांनी करत वादावर पडदा घातला.

दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या शनिशिंगणापूर येथे दौऱ्यावर आल्या. त्या शनी मूर्तीचे दर्शन घेणार असे सांगितले जात होते, पण नियोजनाबाबत गोपनीयता बाळगण्यात आली होती. राष्ट्रपती मुर्मू या शनी मूर्तीचे दर्शन कसे घेणार, याबाबत उत्सुकता होती. राष्ट्रपती मुर्मू आणि त्यांची कन्या शनिशिंगणापूर येथे आल्यावर राष्ट्रपती मुर्मू यांनी चौथऱ्यावर जाऊन शनी मूर्तीला तैलाभिषेक केला आहे.

गर्व आणि आनंद : तृप्ती देसाई

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. तृप्ती देसाई म्हणाल्या, "शनी मूर्तीच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी खूप संघर्ष करावा लागला. परंतु संविधानाने दिलेल्या अधिकार आणि संघर्षामुळे महिलांना शनी मूर्तीचा चौथरा खुला झाला. आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चौथऱ्यावर जाऊन शनी अभिषेक केला. हा क्षण आमच्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाच ठरला आहे."

"महिलांना प्रवेशबंदी घालणाऱ्यांनादेखील समजले असेल, की याच संविधानाच्या अधिकारामुळे राष्ट्रपतिपदी महिला विराजमान आहेत. विरोध करणारेच राष्ट्रपतींना सन्मानाने चौथऱ्यावर घेऊन गेले असणार. आमच्या आंदोलनामुळे देशातील सर्वोच्च पदावर असणाऱ्या महिलेने शनी मूर्ती चौथऱ्यावर जाऊन तैलाभिषेक घातल्याचा गर्व आणि आनंद आहे."

(Edited By - Ganesh Thombare)

President Droupadi Murmu
Supriya Sule : ''...त्यामुळे 'राष्ट्रवादी' कोणाची हे वेगळं सांगायची गरज नाही'' ; सुप्रिया सुळेंचे विधान!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com