Ajit Pawar : अजित पवारांचे शरद पवारांना सडेतोड उत्तर, "फक्त आदिवासी म्हणून झिरवाळांना ठोकू नका"

Ajit Pawar criticize Sharad Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिंडोरी येथे झालेल्या सभेत शरद पवार यांना चोख उत्तर दिले.
Ajit Pawar & Narhari Zirwal
Ajit Pawar & Narhari ZirwalSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election: दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी दिंडोरी येथील सभेत नरहरी झिरवाळ यांच्यावर आरोप केले होते. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार झिरवाळ यांचा किल्ला लढवला. आमदार झिरवाळ यांचा निर्णय योग्यच होता, असे ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार नरहरी झिरवाळ यांच्या प्रचारासाठी आज उपमुख्यमंत्री पवार यांची वणी येथे सभा झाली. या सभेचे वैशिष्ट्य म्हणजे उपमुख्यमंत्री पवार यांनी शरद पवार यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. शरद पवार यांचे आरोप खोडून काढताना आम्ही विचारधारा सोडलेली नाही, असा दावा त्यांनी केला. श्री. झिरवाळ यांच्या कामकाजाचे त्यांनी कौतुक केले.

Ajit Pawar & Narhari Zirwal
Supriya sule : सुप्रिया सुळे म्हणतात, "देवा भाऊ तुम्ही कॉपी करून पास झालात"

उपमुख्यमंत्री म्हणाले, आमदार नरहरी झिरवाळ दिल्लीत वगैरे कुठेही गेलेले नव्हते. त्यांनी कोणताही वेगळा निर्णय घेतला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच्या सर्व 52 आमदारांनी एकत्रितपणे महायुती सोबत जाण्याचा निर्णय घेतलेला होता. यामध्ये सध्या शरद पवार यांच्या सोबत असलेले जयंत पाटील आणि राजेश टोपे यांचाही समावेश होता, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

Ajit Pawar & Narhari Zirwal
Kannad Assembly Election 2024 : लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना स्वाभीमान मिळाला : संजना जाधव

नाशिक जिल्ह्यातील छगन भुजबळ यांच्यापासून तर सर्वच आमदारांनी एकत्रितपणे विकासासाठी महायुती बरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय संबंध जिल्ह्याने घेतला आहे. असे असताना एकट्या झिरवाळ यांनाच दोष का दिला जातो? आदिवासी म्हणून आमदार झिरवाळ यांना ठोकायचे, हे बरोबर नाही. दोन दिवसांपूर्वी झालेल्या सभेत निफाड येथे तर त्यांनी उमेदवारांचे नाव देखील घेतले नाही. अन्य ठिकाणी देखील टीका झाली नाही. मग फक्त आमदार झिरवाळ यांनाच का दोष दिला जातो? असा प्रश्न त्यांनी केला.

आम्ही महायुती बरोबर जाण्याचा निर्णय घेतला. याचा अर्थ विचारधारा सोडली असा होत नाही. आम्ही आजही फुले- शाहू- आंबेडकर विचारधारेला बांधील राहून काम करीत आहोत. 2014 मध्ये पक्षाने भाजपला पाठिंबा दिलाच होता;. 2019 मध्ये शिवसेना आणि काँग्रेसला पक्षाने पाठिंबा दिला होता. त्यांची विचारसरणी पूर्णता वेगळी होती. मग आता भाजपला पाठिंबा दिल्याने काय बिघडले? असा प्रश्न त्यांनी केला.

आम्ही सर्व आमदारांनी विकासासाठी महायुती बरोबर सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्या माध्यमातून हजारो कोटीची विकास कामे आम्ही केली. दिंडोरी मतदार संघात तीन हजार कोटींचा निधी आला. दिंडोरीच्या इतिहासात एवढा निधी कधीही आलेला नसावा. जर सामान्य जनतेचा विकास होत असेल तर, आम्हाला दोष का दिला जातो? असा प्रश्न उपमुख्यमंत्र्यांनी केला.

आम्ही घेतलेल्या निर्णयावर टीका होते. मात्र लोकसभा निवडणुकीत जाणीवपूर्वक खोटा प्रचार करण्यात आला. 400 जागा हव्यात म्हणजे घटना बदलणार आहेत. हे राष्ट्र हिंदुराष्ट्र करण्यात येईल, असा अपप्रचार झाला. प्रत्यक्षात असे काहीही होणार नव्हते. मात्र मतदार त्या प्रचाराला बळी पडले. लोकसभा निवडणुकीत आमचा पराभव झाला.

महायुतीचे मुख्यमंत्री आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र बसलो. चर्चा केली. त्यातून महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली. महिला आजवर सतत उपेक्षित राहिल्या होत्या. त्यांचा विचार पहिल्यांदा आम्ही केला. शेतीसाठी वीज बिल माफ केले. असे विविध निर्णय घेतले आहेत. पुढील पाच वर्ष लाडकी बहीण योजनेचे अनुदान आणि विज बिल माफी हवी असेल तर, पुन्हा महायुती सरकारलाच मतदान करा. नरहरी झिरवाळ निवडून आले की, पुढील पाच वर्ष चिंता करण्याचे कारण नाही. या सर्व योजना पुढे सुरू राहतील. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com