Ajit Pawar Politics: अजित पवार म्हणाले, `तो` राग मतदानातून व्यक्त करू नका

Ajit Pawar; Deliberate defamation by the opposition, projects will not goes to Gujarat-उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचे नेते जाणीवपूर्वक अपप्रचार करीत असल्याचा दावा केला.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सजग होण्याचे निर्देश दिले आहेत. ते म्हणाले, शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे दगा फटका होऊ देऊ नका. जागरूक राहून काम करा.

महायुतीच्या योजनांमुळे जनता खुश आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते जाणीवपूर्वक खोटे बोलतात. या योजनांसाठी पैसे कुठून आणणार, असे विचारतात. मात्र तुम्ही चिंता करू नका. महाराष्ट्राच्या योजना सुरूच राहतील. पैसे कमी पडले तर जपान किंवा जागतिक बँकेकडून पैसे आणू मात्र योजना सुरूच ठेवू, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

Ajit Pawar
Dr. Rohan Borse : डॉ रोहन बोरसे बिघडवणार नांदगाव मतदारसंघात कोणाचे गणित बिघडवणार?

राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीचे सरकार सर्वसामान्य नागरिक आणि समाजाच्या सर्व घटकांसाठी उत्तम काम करीत आहे. त्यासाठी अनेक योजना आम्ही राबवित आहोत. या योजनांचा धसका विरोधी पक्षाच्या लोकांनी घेतला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे आता प्रचाराला मुद्देच राहिलेले नाहीत, असा दावा मुख्यमंत्री पवार यांनी केला.

Ajit Pawar
Manoj Jarange : जरांगेंच्या विधानानं मराठा समाज हळहळला; 'शरीर कधी धोका देईल, सांगता येत नाही' ...पाहा VIDEO

महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातला गेले आहेत. त्यामुळे रोजगाराच्या संधी गेल्या. यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा प्रचारात भर आहे. काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांनीही दहा लाख कोटींची गुंतवणूक गुजरातला गेल्याचा दावा केला आहे. त्याचा परिणाम मतदारांवर होत असल्याचे बोलले जाते. त्याची दखल उपमुख्यमंत्री पवार यांनी घेतली.

यासंदर्भात त्यांनी विरोधकांकडून जाणीवपूर्वक बदनामी करण्यात येत आहे, असा दावा केला. या बदनामीला उत्तर कार्यकर्त्यांनीच द्यावे. कोणतेही उद्योग गुजरातला जात नाहीत. राज्यात मुख्यमंत्री आणि आम्ही दोन उपमुख्यमंत्री कशासाठी बसलो आहोत. महाराष्ट्राचे नुकसान होईल, असं कोणतंही काम आम्ही होऊ देणार नाही. विरोधकांकडे मुद्दे नसल्याने ते अपप्रचार करतात, असे ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री पवार यांनी हरियाणा प्रमाणेच महाराष्ट्रातही मोठा प्रयोग होणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत महायुतीची सत्ता येईल, असा शब्द मला दिला आहे. त्यामुळे विरोधकांनी कितीही अपप्रचार केला तरी निवडणूक निकालावर काहीही परिणाम होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री पवार यांनी देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांच्यासाठी शनिवारी गिरणारे येथे सभा घेतली. यावेळी त्यांनी आमदार अहिरे यांची ही पहिलीच टर्म आहे. त्यामुळे कोणी दुखावले गेले असेल तर, त्याचा राग मतदानातून काढू नका. त्यांना समजून घ्या. शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अधिक जागरूक होऊन काम करावे. निवडणूक आपल्या हातात आहे. आमदार अहिरे यांच्यासाठी मतदारसंघात अनेक विकास कामांना मी पुढाकार घेऊन निधी दिला आहे. त्यावर माझे बारीक लक्ष असेल असेही सांगितले.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com