Dr. Rohan Borse : डॉ रोहन बोरसे बिघडवणार नांदगाव मतदारसंघात कोणाचे गणित बिघडवणार?

Manoj Jarange Patil Yevala tour impact on Nandgaon: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या येवला दौऱ्याचा इफेक्ट नांदगाव मतदार संघावरही होण्याचे संकेत आहेत.
MLA Suhas Kande, Dr Rohan Borse & Ex MP Sameer Bhujbal
MLA Suhas Kande, Dr Rohan Borse & Ex MP Sameer BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election 2024: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी येवला मतदार संघाचा दौरा केला. या दौऱ्याचा परिणाम लगतच्या नांदगाव मतदार संघावरही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नांदगाव मतदार संघातील प्रचार शेवटच्या टप्प्यात अधिक रंगतदार झाला आहे.

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते जरांगे पाटील यांनी काल मंत्री छगन भुजबळ उमेदवार असलेल्या येवला मतदार संघात भेट दिली. त्यांच्या स्वागतासाठी मराठा आरक्षण आंदोलनातील अनेक नेते आणि कार्यकर्ते जमले होते. नांदगाव येथूनही मोठ्या संख्येने कार्यकर्ते गेले होते. या दौऱ्यात मनोज जरांगे पाटील यांनी कोणत्याही राजकीय नेत्याचे नाव घेतले नाही.

MLA Suhas Kande, Dr Rohan Borse & Ex MP Sameer Bhujbal
Eknath Shinde : सरोज आहिरे याच महायुतीच्या उमेदवार; मुख्यमंत्री शिंदे यांनी राजश्री अहिरराव यांना सोडले वाऱ्यावर!

जरांगे पाटील यांनी समाजाला अतिशय भावनिक साद घातली आहे. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांना आडवे करा. मतदानाला जाताना आपल्या लेकरा-बाळांच्या भविष्याचा विचार करा. आपल्या लेकरा बाळांशिवाय अन्य कोणीही तुम्हाला अडचणीच्या काळात मदतीला येणार नाही. हे लक्षात ठेवून मतदान करा, असे सूचक विधान जरांगे पाटील यांनी केले.

MLA Suhas Kande, Dr Rohan Borse & Ex MP Sameer Bhujbal
Manoj Jarange : जरांगेंच्या विधानानं मराठा समाज हळहळला; 'शरीर कधी धोका देईल, सांगता येत नाही' ...पाहा VIDEO

येवला मतदार संघात राज्याचे ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ उमेदवार आहेत. त्यांचा ओबीसी प्रवर्गातून मराठासमाजाला आरक्षण देण्यास विरोध आहे. त्यांनी सातत्याने जरांगे पोटील यांना विरोध करण्याची भूमिका घेतली. लगतच्या नांदगाव मतदार संघात मंत्री भुजबळ यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ अपक्ष उमेदवार आहेत. शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार सुहास कांदे हे महायुतीचे उमेदवार आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने गणेश धात्रक यांना उमेदवारी दिली आहे.

यामध्ये मराठा महासंघाने पुरस्कृत केलेले सामाजिक कार्यकर्ते आणि कोरोना काळात आरोग्यसेवा बजावल्याने `देवदूत` असे संबोधल्या जाणाऱ्या अपक्ष डॉ रोहन बोरसे यांच्या उमेदवारीला त्याचा लाभ होण्याची शक्यता आहे. डॉ बोरसे आणि शिवसेनेचे गणेश धात्रक हे दोघेही स्थानिक उमेदवार आहेत. अन्य उमेदवार मतदारसंघाबाहेरचे आहेत. त्यामुळे भूमिपुत्र अशी साद घालत नांदगाव मतदार संघात यंदा जोरदार प्रचार सुरू आहे.

अपक्ष डॉक्टर बोरसे यांना स्थानिक नागरिकांकडून मिळणाऱ्या प्रतिसाद पाहता, ते निवडणूक निकालाचे गणित बिघडवणार हे स्पष्ट झाले आहे. चार प्रमुख उमेदवारांमध्ये अन्य तीन उमेदवार ओबीसी तर डॉ बोरसे हे एकमेव मराठा उमेदवार आहेत. त्यांना अन्य समाजातूनही सामाजिक कार्यकर्ता आणि आरोग्य सेवा या कारणाने पाठिंबा मिळत असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यामुळेच मनोज जरांगे पाटील यांचा दौरा येवल्याला झाला. मात्र त्याचा इफेक्ट नांदगाव मतदारसंघातही होण्याची शक्यता आहे. ही बदललेली राजकीय स्थिती नांदगाव मतदार संघातील मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com