

Ahilyanagar politics : दंगल प्रकरणात अन् पोलिसांना मारहाणीच्या गुन्ह्यात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे कोपरगावमधील आमदार आशुतोष काळे यांच्या खासगी स्वीय सहायक अरुण जोशी याला न्यायालयाने दणका दिला आहे.
गुन्ह्यात जामिनासाठी दाखल अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. साक्षीदारांवर दबाव आणला जाऊ शकतो, असे निरीक्षण नोंदवत कोपरगाव इथल्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीशांनी हा निर्णय दिला.
कोपरगावमधील (Kopargaon) मोहिनीराजनगर इथं 24 सप्टेंबरला रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास दंगल घडली. आमदार आशुतोष काळे यांचा खासगी स्वीय सहायक अरुण जोशी याने आयोजित केलेल्या दांडिया कार्यक्रमाजवळ फिर्यादी विवेक आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वाहन अडवले. अरुण जोशी आणि त्याच्या साथीरांनी क्रिकेट स्टम्प, लोखंडी रॉड, लाकडी दांडके आणि तलवार यांसारख्या शस्त्राने मारहाण केली.
आरोपींनी जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केल्याचा आरोप 'एफआयआर'मध्ये आहे. या हल्ल्यात सिध्दू गीते, फिर्यादी, त्यांची आई आणि बहीण जखमी झाले. सिध्दू आणि फिर्यादींना डोक्याला जखमा झाल्या, तर अविनाश गीते यांच्या हाताला मोडला. हिराबाई आणि फिर्यादी विवेक यांच्या गळ्यातील दागिने गेले.
अशा गुन्ह्यात जामीन मिळावा, यासाठी अरुण जोशी याने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. सरकारी वकील आणि फिर्यादीच्या वकिलांनी आरोपीच्या जामिनाला जोरदार विरोध केला. भारतीय न्याय संहितामधील कलमानुसार गंभीर गुन्हा दाखल आहे. यात जन्मठेपीची तरतूद आहे. अरुण जोशी हा कोपरगावचे लोकप्रतिनिधी आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांचा खासगी स्वीय सहायक आहे. अत्यंत प्रभावशाली व्यक्ती आहे. यामुळे तो तपास प्रक्रियेत हस्तक्षेप करू शकतो. तसेच साक्षीदारांचे जबाब अजून नोंदवायचे आहेत. त्यांच्यावर दबाव आणू शकतो, अशी भीती व्यक्त केली.
आरोपीने स्वतः शरणागती पत्करल्यानंतरही पोलिसांनी त्याची पोलिस कोठडी न मागता थेट न्यायालयीन कोठडी मागितली. यावरून पोलिसांकडून आरोपीला मदत केली जात असल्याचा गंभीर आरोप फिर्यादीच्या वकिलांनी केला. दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.
आशुतोष काळे हे कोपरगावचे विद्यमान आमदार आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते आमदार आहेत. त्यांच्या स्वीय सहायक अरुण जोशी याने मोहिनीराजनगरमध्ये दंगल घडवलीच, पण पुढे याच गुन्ह्यातून आणखी एक गुन्हा केला. पोलिस ठाण्यात पोलिसांवर हाच उगारला. तो देखील स्वतंत्र गुन्हा दाखल आहे. अरुण जोशी आणि त्याच्या साथीदारांची सध्या रवानगी ही नाशिकच्या कारागृहात करण्यात आलेली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.