Ajit Pawar News : पाडळसे प्रकल्पासाठी अजितदादांनी दिली डेडलाईन; केंद्र सरकारला घालणार साकडं

Padalse Project : पाडळसे निम्न तापी धरण प्रकल्पाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी‌ केली पाहणी...
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon : पाडळसे प्रकल्प कधी पूर्ण होणार, याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डेडलाईन दिली आहे. जून 2025 पर्यंत पाणी अडविण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पाच्या कामांसाठी केंद्र शासनाची मदत घेऊन निधी‌ कमी पडू दिला जाणार नसल्याची ग्वाही अजित पवारांनी आज दिली. या प्रकल्पामुळे अमळनेर व परिसरात आर्थिक सुबत्ता येणारअसल्याचेही ते म्हणाले.

अजित पवार (Ajit Pawar) यांनी अमळनेर तालुक्यातील पाडळसे निम्न तापी प्रकल्प धरणाची (Padalse Project) आज पाहणी केली. याप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil), ग्रामविकास, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर (Deepak Kesarkar), जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक एम. राजकुमार आदी उपस्थित होते.

Ajit Pawar
Raj Thackeray On MNS Party Workers : 'हे आता शेवटचे इंजेक्शन...' राज ठाकरेंचा सज्जड दम

शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आले पाहिजे. यासाठी शासन काम करत आहे. केंद्र शासनाने अर्थसंकल्पात चांगले निर्णय घेतले आहेत. तापी प्रकल्पाचे मध्यप्रदेश, गुजरात व महाराष्ट्रात (Maharashtra) समन्यायी पाणी वाटपाचा प्रश्न मार्गी लावण्यात केंद्र शासनाला अडचण नसल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील म्हणाले की, पाडळसे प्रकल्प दोन जिल्ह्यांना संजीवनी‌ ठरणार प्रकल्प आहे. आर्थिक निधीसाठी केंद्राच्या मंजुरीसाठी प्रस्ताव आहे. 2025 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याच्या उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पाडळसे‌ निम्न तापी धरण प्रकल्पाची वैशिष्ट्ये

अमळनेर तालुक्यातील तापी नदीवरील निम्न तापी प्रकल्प सन 1999 पासून बांधकामाधीन आहे. एकूण लाभक्षेत्र 43,600 हेक्टर इतके नियोजित असून त्यासाठी 17.01 TMC पाणी वापरास मंजुरी प्राप्त आहे. या प्रकल्पामुळे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा, धरणगाव व पारोळा आणि धुळे जिल्ह्यातील धुळे व शिंदखेडा या तालुक्यांना लाभ होईल. हा प्रकल्प दोन टप्प्यात करण्याचे नियोजन आहे. पहिल्या टण्यात १०.४० TMC पाणीवापर करुन 25,657 हेक्टर लाभक्षेत्र तयार होणार आहे.

प्रकल्पाच्या टप्पा 1 साठी 2,472 हेक्टर भूसंपादन आवश्यक असून त्यापैकी 770 हेक्टर संपादन पूर्ण झाले आहे. उर्वरित भूसंपादनाची कार्यवाही प्रगतीत आहे. तसेच 5 गावे पूर्णतः व 6 गावांचे अंशतः पुनर्वसन करावे लागणार आहेत. त्यापैकी 3 गावांची पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण झाली असून 1 गावाची प्रक्रिया प्रगतीत आहे. 7 गावांसाठी जागा निश्चिती करिता कार्यवाही प्रगतीत आहे. या प्रकल्पावर आतापर्यंत एकूण 763 कोटी रूपये खर्च झाले आहेत. या आर्थिक वर्षात 100 कोटी रूपये एवढी तरतुद आहे. या प्रकल्पाला नुकतीच 4,890 कोटी‌ रूपये एवढ्या अद्यावत किंमतीस सुधारीत प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.

(Edited By - Rajanand More)

Ajit Pawar
Lok Sabha Election 2024 : गिरीश महाजन शोधतायेत 'खडसे' नावाला पर्याय; उल्हास पाटील यांच्या भाजप प्रवेशाने...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com