Lok Sabha Election 2024 : गिरीश महाजन शोधतायेत 'खडसे' नावाला पर्याय; उल्हास पाटील यांच्या भाजप प्रवेशाने...

Girish Mahajan Vs Eknath Khadse : गेल्या काही दिवसांत महाजन यांनी विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी न देण्याचे संकेत दिले होते.
raksha khadse, Girish Mahajan, Eknath Khadse
raksha khadse, Girish Mahajan, Eknath Khadsesarkarnama
Published on
Updated on

Political News : महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांचे राजकीय वैर साऱ्यांना ठाऊक आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीत एकनाथ खडसे यांना रोखण्याची रणनीती गिरीश महाजन यांच्याकडून आखण्यात येत आहे. रावेर मतदारसंघातून एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीकडून (शरद पवार गट) आपली उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या विरोधात विद्यमान खासदार त्यांच्या स्नुषा रक्षा खडसे असतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण गिरीश महाजन आपले वजन कोणाच्या पारड्यात टाकणार, यावर भाजपमधील उमेदवारी निश्चित होईल अशी चर्चा आहे. (Lok Sabha Election 2024 )

raksha khadse, Girish Mahajan, Eknath Khadse
Girish Mahajan News : गिरीश महाजनांचा दे धक्का! विरोधकांकडे उमेदवारच ठेवला नाही!

काँग्रेस पक्षाचे नेते डॉ. उल्हास पाटील (Ulhas patil) यांनी आपल्या कन्येसह भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपमध्ये उमेदवारीसाठी चुरस आहे. तर, महाजन (Girish mahajan) यांनी गेल्या काही दिवसांत विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी न देण्याचे संकेत दिले होते. सध्या काँग्रेसचे डॉ. उल्हास पाटील हे आणि त्यांच्या कन्या या देखील लोकसभा निवडणुकीत रावेर मतदारसंघातून इच्छुक आहेत. मात्र त्यांचा नुकताच भाजपमध्ये प्रवेश झाल्याने त्यांना विरोध होण्याची शक्यता आहे. शिवाय भाजपकडे उमेदवारीसाठी अन्य प्रबळ दावेदार असल्याने डॉ. पाटील यांचा उमेदवारीसाठी कितपत विचार होईल याबाबत शंका आहे.

महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांकडे 'खडसे' या नावाभोवती सर्व राजकीय पर्याय केंद्रित झाले आहे. भाजपला विद्यमान खासदार रक्षा खडसे यांची उमेदवारी रद्द करताना अन्य राजकीय पर्यायांचा गांभीर्याने विचार करावा लागेल. त्यात एकनाथ खडसे यांची मतदारसंघातील पकड आणि भाजपमध्ये निर्माण झालेली स्थिती याचा विचार करावा लागेल. भाजपने विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी दिल्यास विरोधी गटाकडून एकनाथ खडसे यांच्या ऐवजी अन्य पर्याय उमेदवाराचा शोध घेतला जाण्याची शक्यता आहे. खासदार रक्षा खडसे यांची उमेदवारी भाजपने रद्द केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट एकनाथ खडसे हे या मतदारसंघातून प्रबळ दावेदार असतील.

खडसे विरुद्ध खडसे

रावेर मतदारसंघाचे राजकारण हे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये 'खडसे' नावा भोवती फिरण्याची शक्यता आहे. आपण सासऱ्या विरोधात लढण्यास तयार असल्याचे संकेत पूर्वीच रक्षा खडसे यांनी दिले होते. तर,राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) उमेदवार म्हणून आपणच असल्याचे एकनाथ खडसे यांनी जाहीर केले होते. त्यामुळे मतदारसंघात खडसे विरुद्ध खडसे असा सामान होण्याची शक्यता आहे. रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळाली नाही. तर एकनाथ खडसे यांच्या उमेदवारीमुळे मतदारसंघात खडसे नावाचीच चर्चा अधिक होण्याची शक्यता आहे.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com