Sinnar Assembly constituency: सिन्नर विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या प्रचार जोर धरू लागला आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सिन्नरला सभा झाली. या सभेला मोठा प्रतिसाद मिळाला.
सिन्नरला झालेल्या या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिन्नरचे उमेदवार आमदार माणिकराव कोकाटे, कोपरगावचे आमदार आशुतोष काळे आणि देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांना मतदान करण्याचे आवाहन केले. कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी परिश्रम घेऊन विजयी करावे. त्यात काहीही कमतरता ठेवू नये, असे त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, सिन्नर मतदार संघासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी सातत्याने प्रयत्न करून विकास कामांना मंजुरी मिळवली. विविध टप्प्यांमध्ये आम्ही त्यांना निधी दिला. अनेक चांगली कामे त्यामुळे होऊ शकली. या मतदारसंघात पाण्यासाठी मोठे काम होत आहे. ते पुढे सुरू राहावे, यासाठी कोकाटे यांना मतदारांनी पाठिंबा द्यावा.
सिन्नर मतदार संघाला गेल्या पाच वर्षात सतरा हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. एवढ्या निधी बारामती मतदारसंघाला देखील मिळालेला नाही. सिन्नरच्या इतिहासात एवढा निधी आणि विकास कामे हे एक रेकॉर्ड आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने त्यासाठी खास परिश्रम घेतले आहे.
आमदार कोकाटे यांना मागितलेल्या सर्व विकास कामांना मंजुरी देण्याचे काम मी केले. प्रचंड निधी दिला आहे. आम्ही आमचे काम केले आहे. आता सिन्नरकरांना त्यांचे काम करायचे आहे. त्यांनी आमदार कोकाटे यांना निवडून द्यावे. त्यांना राज्यात मंत्री देखील करण्याची माझी तयारी आहे. राज्यात महायुतीचे सरकार आल्यावर त्यांचे योग्य पुनर्वसन करण्याची जबाबदारी मी घेतो. सिन्नरच्या मतदारांनी त्यांना भरघोस मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.
ते म्हणाले, दोन दिवसांपूर्वी झालेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार कोकाटे यांच्यावर विरोधकांनी टीका केली. ही टीका अनाठायी आहे. विकास कामे झाली आहेत. त्यामुळे कुठलेही मुद्दे नसल्याने अशी टीका करण्याचे राजकारण होत असते. मतदारांनी मात्र सुज्ञ पणे मतदान करावे.
केंद्रात पंतप्रधान मोदी यांचे सरकार आहे. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी मला राज्याच्या विकासासाठी जे जे आवश्यक असेल, ते सर्व सहकार्य करण्याचा शब्द दिला आहे. केंद्रातील सर्व मंत्री महाराष्ट्राच्या विकासासाठी पुढे येऊन काम करत आहेत.
राज्याचा सर्वांगीण विकास करावयाचा असेल आणि लाडकी बहीण यांपासून तर शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्याला मतदारांनी महायुतीच्या सरकारला पुन्हा एकदा सत्तेत आणावे, असे आवाहन त्यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.