Mallikarjun kharge Politics: खर्गे यांचा भाजपला टोला, "हा महाराष्ट्र आहे 370 नव्हे, सोयाबीनचे बोला"

Mallikarjun kharge; Congress President Kharge criticize PM Narendra Modi for lying on genuine issues-धास्तावलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सर्व मंत्री सध्या दिवसरात्र महाराष्ट्रात फिरत आहेत.
PM Narendra Modi & Mallikarjun Kharge
PM Narendra Modi & Mallikarjun KhargeSarkarnama
Published on
Updated on

Assembly Election 2024: हा महाराष्ट्र आहे. जम्मू काश्मीर नाही. इथे 370 कलम नव्हे तर सोयाबीन आणि शेतकऱ्यांच्या, जनतेच्या प्रश्नांचं बोला, असे आव्हान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदी यांना दिले.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची आज त्र्यंबकेश्वर येथे जाहीर सभा झाली. पक्षाचे उमेदवार लकी जाधव यांना मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले. काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे सरकार राज्य वाचवेल. त्यामुळे जनतेने जागरूक होऊन महाविकास आघाडीला मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.

PM Narendra Modi & Mallikarjun Kharge
Ajit Pawar : अजित पवारांचे शरद पवारांना सडेतोड उत्तर, "फक्त आदिवासी म्हणून झिरवाळांना ठोकू नका"

श्री खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर अतिशय कडवट टीका केली. ते म्हणाले, लोकसभेपासून पंतप्रधान मोदी आणि त्यांचा पक्ष प्रचंड घाबरला आहे. धास्तावलेले पंतप्रधान सहा वेळा महाराष्ट्रात येऊन गेले. पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सगळेच सदस्य महाराष्ट्रावर तुटून पडले आहेत. याचा अर्थ त्यांनी निवडणूक निकालाचा धसका घेतला आहे.

PM Narendra Modi & Mallikarjun Kharge
Nashik Assembly Election 2024 : पश्चिम विधानसभा मतदारसंघात हिरेच शांतता आणतील; मामा ठाकरे

ते म्हणाले, पंतप्रधान मोदी सातत्याने 370 कलमाबाबत विधाने करीत आहेत. हा महाराष्ट्र आहे, जम्मू किंवा काश्मीर नाही. इथे 370 कलमा ऐवजी सोयाबीनला भाव का नाही? यावर बोलण्याची गरज आहे. मात्र शेतकरी, सामान्य नागरिक, महिला यांचे मूळ प्रश्न बाजूला ठेवून ही मंडळी दिशाभूल करण्यात व्यस्त आहे. त्यांना जनतेच्या मुळ प्रश्नांशी देणे घेणेच नाही.

कर्नाटक आणि अन्य राज्यात काँग्रेस पक्षाच्या सरकारने जे जे केले, त्याची कॉपी ही मंडळी करीत आहे. आम्ही देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महात्म्याला गोळ्या घालणाऱ्या नथुराम गोडसेंचे कौतुक ही मंडळी करते. अशा लोकांना मतदारांनी आपल्याजवळ सुद्धा येऊ देऊ नये. भाजप आणि संघ हे विष आहे. ते चाटून पाहिले तरी तुम्ही संपून जाल. म्हणून तुम्ही एक व्हा आणि महाराष्ट्र वाचवा, असे आवाहन खरगे यांनी केले.

काँग्रेसकडे अनेक गुणवंत आणि ज्ञानवंत मंडळी आहेत. काँग्रेसने महाविद्यालये, कारखाने, धरणे बांधली. पंतप्रधान मोदी यांनी दहा वर्षात काय केले? ते सांगतात आम्ही डॉक्टर आणि इंजिनियर बनवले. त्यांच्या सरकारचे आयुष्य दहा- अकरा वर्षांचे आहे. त्यात रस्ते तरी धड झाले आहेत का? ही मंडळी काहीही बोलतात. त्यामुळे जनतेने अशा लोकांपासून सावध राहावे.

आज सोयाबीनला भाव नाही. जेव्हा शेतकऱ्यांचा कांदा बाजारात येतो, तेव्हा ही मंडळी कांदा आयात करतात. शेतकऱ्यांना भाव कसा मिळणार नाही, असे धोरण राबवतात. यांच्या राज्यात रोज 60 शेतकरी आत्महत्या करतात. तरीही हे सरकार निद्रिस्त आहे. या गंभीर विषयावर ते तोंड का उघडत नाही, असा प्रश्न खर्गे यांनी केला.

सत्ता राखण्यासाठी भाजपचे नेते केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून विरोधकांना त्रास देतात. तेव्हढेच फेकू नरेंद्र मोदी यांचे काम आहे. अशा खोटारड्या लोकांना मतदान करू नका. महाराष्ट्राच्या हिताचा विचार करून महाविकास आघाडीला सत्तेत आणण्यासाठी मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com