NCP Ajit Pawar: बॅनर बदलल्याने प्रदेशाध्यक्षांसमोरच कार्यकर्त्यांचा घोषणा देत संताप!

Ajit Pawar Politics; party workers shout slogans, angry on MLA Ahire Supporters-राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या युवा संवाद मेळाव्यात कार्यकर्त्यांचे रंगले मानापमान नाट्य,जोरदार वाद
Yogesh Nisal, Saroj Ahire
Yogesh Nisal, Saroj AhireSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा मेळावा आज देवळाली कॅम्प येथे झाला. मात्र हा मेळावा संवादा ऐवजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांतील विसंवादाने गाजला. यावेळी दोन्ही बाजूंकडून एकमेकांविरुद्ध तक्रारी झाल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या युवा शाखेतर्फे आज देवळाली कॅम्प येथील सिंधी पंचायत सभागृहात युवा संवाद मेळावा झाला. शासकीय योजनांच्या प्रचार आणि प्रसारासाठी हा मेळावा होता. मात्र मेळावा सुरू होण्याआधीच तो वादविवादाने गाजला.

मेळावा होणाऱ्या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष योगेश मिसाळ यांनी स्वतंत्र बॅनर लावला होता. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांसह त्यांचा फोटो होता. मात्र आज सकाळी स्थानिक आयोजकांनी हा बॅनर काढून टाकला.

कार्यक्रमाच्या ठिकाणी लावलेले अन्य बॅनर देखील काढले. त्याऐवजी आमदार अहिरे यांची मोठी छबी असलेला आणि अन्य नेत्यांचे लहान फोटो असलेला बॅनर लावला. कार्यक्रम सुरू होताना जिल्हा अध्यक्ष निसाळ आणि त्यांचे समर्थक आले.

Yogesh Nisal, Saroj Ahire
Narhari Zirwal Politics: झिरवळपुत्राचा संशयकल्लोळ; म्हणे, पक्षाने लढ म्हटले तरच वडिलांविरुद्ध दंड थोपटणार!

जिल्हाध्यक्ष निसाळ समर्थकांनी बॅनर काढल्याचे पाहून संताप व्यक्त केला. बॅनरवर पक्षाचे प्रमुख अजित पवार आणि छगन भुजबळ यांचे फोटो होते. तो बॅनर का काढला? असा जाब त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना केला.

त्यावरून हा वाद चांगलाच वाढत गेला. यावेळी पक्षाचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या उपस्थितीतच या वादाला तोंड फुटले. काही वेळ कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. छगन भुजबळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी सभागृह डोक्यावर घेतले.

यावेळी वजाहद शेख, कपिल भावले, अमर जगताप, आकाश मस्के यांसह विविध कार्यकर्त्यांनी छगन भुजबळ जिंदाबाद अशा घोषणा देत, सभागृहातील पदाधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे वातावरण तापले होते. व्यासपीठावरील पदाधिकाऱ्यांनी खाली येऊन या कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

Yogesh Nisal, Saroj Ahire
Jayant Patil Politics: सिन्नर मध्ये जयंत पाटील यांची निराशा? उमेदवारीचा होणार शॉकिंग निर्णय!

नाराज झालेले हे कार्यकर्ते कार्यक्रमातून निघून जाऊ लागले. यावेळी अन्य पदाधिकाऱ्यांनी त्यांची विनवणी करून त्यांना सभागृहात बसवले. अन्य पदाधिकाऱ्यांनी जिल्हा अध्यक्ष मिसाळ यांची मनधरणी करीत त्यांना व्यासपीठावर नेले.

त्यानंतर कार्यक्रम सुरू झाला. मात्र त्यात कार्यकर्ते मनापासून सहभागी झाले नाही. यावेळी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी मिसाळ यांना हात धरून व्यासपीठावर नेले. प्रदेशाध्यक्षांसमोरच हा वाद झाल्याने ते देखील हतबल झालेले दिसले.

यावेळी जिल्हा अध्यक्ष निसाळ यांनी नाराजी व्यक्त केली. हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आम्ही अहोरात्र परिश्रम घेतले. रात्री दहा वाजेपर्यंत येथे बॅनर लावले. गर्दी जमवली. मात्र ऐनवेळी आमचे बॅनर काढून टाकले. केवळ आमदार सरोज अहिरे यांचा मोठा फोटो असलेले बॅनर लावले. हे पक्षाच्या धोरणाच्या विरोधात आहे. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा अपमान आहे. असे नेहमी होऊ लागले आहे, अशी तक्रार केली.

हा कार्यक्रम झाल्यानंतर आमदार अहिरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या कार्यालयात नेले. यावेळी त्यांनी काही पदाधिकारी सातत्याने आपल्या विरोधात भूमिका घेतात. विविध प्रकारे आपल्याला त्रास दिला जातो. पक्षाचे कामकाज करताना विविध अडचणी येतात, अशा तक्रारी केल्याचे कळते.

दरम्यान या प्रकाराशी आपला काहीही संबंध नाही. मी त्या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांचे भाषण सुरू असताना गेले. आपले मनोगत व्यक्त केल्यानंतर निघून आले. त्यामुळे तेथील वादाबाबत आपल्याला काहीही माहित नसल्याचे सांगितले.

युवा संवाद मेळाव्याला आमदार अहिरे महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख प्रेरणा बलकवडे विष्णुपंत म्हैसधुणे देवळाली कॅम्पचे नवनियुक्त अध्यक्ष सोनू राम वाणी मनोहर कोरडे निवृत्ती अरींगळे यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com