Ajit Pawar Politics: अजित पवार गटाला धक्का, देविदास पिंगळे उमेदवारीसाठी काँग्रेसच्या संपर्कात?

Ajit Pawar Followers Running to Congress For Candidature: अजित पवारांच्या गटातील नेत्यांचा होतोय कोंडमारा, उमेदवारीसाठी काँग्रेस नेत्यांशी संपर्क?
Devidas Pingle, Hemlata Patil & Vasant Gite
Devidas Pingle, Hemlata Patil & Vasant GiteSarkarnama
Published on
Updated on

NCP, Congress News: नाशिक मध्य हा मतदार संघ जिल्ह्यातील अनेक इच्छुकांना आकर्षित करतो आहे. त्यातच महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांना ही जागा हवी आहे. महायुतीतील अनेक नेते त्यासाठी उत्सुक आहेत. यातच आता अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची चिन्हे आहेत.

नाशिक मध्य मतदारसंघात भाजपच्या देवयानी फरांदे विद्यमान आमदार आहेत. त्या आमदार राहतील की नाही, यावर अनेक संस्था रोज सर्वेक्षण करीत आहेत. मुंबई दिल्लीच्या या संस्थांकडून रोज नाशिक मध्य या मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे.

आता महायुतीच्या घटक पक्षांतच उमेदवारीसाठी स्पर्धा लागल्याचे दिसते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष निरंजन ठाकरे काँग्रेसच्या संपर्कात असल्याच्या बातम्या आहेत. मात्र त्याआधीच पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि बाजार समितीचे सभापती माजी खासदार देविदास पिंगळे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी चर्चा केल्याचे कळते.

माजी खासदार पिंगळे यांच्या काही समर्थकांनी काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी देखील संपर्क केला आहे. माजी खासदार पिंगळे यांना उमेदवारी मिळावी, यासाठी काँग्रेससह अजित पवार गटाचे विविध पदाधिकारी काँग्रेसच्या संपर्कात आहेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल हे नाशिक मध्य मतदार संघात इच्छुक वाढण्याचे प्रमुख कारण आहे.

Devidas Pingle, Hemlata Patil & Vasant Gite
Rohit Pawar News : 'आमच्याबाबत सुडाचे राजकारण कुणी करत असेल, तर..' ; रोहित पवारांचा इशारा!

भारतीय जनता पक्षात देखील अनेक संस्था माहिती संकलित करीत असल्याने अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे भाजपमध्ये आमदार देवयानी फरांदे यांना उमेदवारीसाठी स्पर्धक तयार होऊ लागले आहेत. सुरेश पाटील यांना यापूर्वी उमेदवारी जवळपास निश्चित होती. ऐनवेळी त्यांच्या ऐवजी प्राध्यापक फरांदे यांना उमेदवारी मिळाली होती.

त्यामुळे सुरेश पाटील तसेच अन्य इच्छुक यंदा जोरात कामाला लागले आहे. त्यात आता महायुतीचाच एक मोठा नेता काँग्रेसच्या संपर्कात असल्याने मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. नव्या इच्छुकांमुळे गेली वर्षभर या मतदारसंघात नियोजनपूर्वक परिश्रम करणाऱ्या इच्छुकांची अस्वस्थता वाढत आहे.

नाशिक मध्य मतदारसंघ काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ मानला जातो. येथून पक्षाच्या प्रवक्त्या डॉ हेमलता पाटील आणि पक्षाचे प्रदेश सचिव राहुल दिवे हे प्रमुख दावेदार आहेत. या दोन्ही उमेदवारांनी संपूर्ण मतदारसंघात संपर्क मोहीम राबविली आहे. वरिष्ठ नेत्यांकडे उमेदवारीसाठी अधिकृत अर्ज केले आहेत.

Devidas Pingle, Hemlata Patil & Vasant Gite
Bapu Chaure Politics: डी. एस. अहिरेंचा तोल सुटला, निरीक्षकांपुढेच काँग्रेसचे दोन गटांत धुमशचक्री!

यंदा हा मतदार संघासाठी भारतीय जनता पक्षाशी प्रभावी लढत देऊ शकेल, अशा उमेदवाराचा शोध घेतला जात आहे. शिवसेना ठाकरे गटाने त्यासाठी आघाडी घेतली. माजी महापौर आणि विविध क्षेत्रात सक्रिय असलेल्या वसंत गीते यांच्या उमेदवारीचा ठराव केला आहे. माजी आमदार गीते यांनी यंदा निवडणूक लढविण्यासाठी जोरदार फील्डिंग लावली आहे.

भाजपची अनेक मंडळी श्री गीते यांच्याबाबत सहानुभूती ठेवून आहेत. मतदारसंघात यापूर्वीही आमदार असल्याने त्यांचा संपर्क आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट हा मतदारसंघ माजी आमदार गीते यांच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय करणार आहे. या स्थितीत काँग्रेस पक्षाकडे वाढलेली गर्दी काँग्रेसचा आत्मविश्वास टिकवून ठेवण्यात किती यशस्वी ठरते, याची सगळ्यांना उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com