नितीन पवार हे तर `एटी`च्याही एक पाऊल पुढे आहेत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली विकासकामांसाठी निधीची ग्वाही
Ajit Pawar with NCP leaders
Ajit Pawar with NCP leadersSarkarnama
Published on
Updated on

कळवण : मी प्रथम आमदार झालो तेव्हासुद्धा एवढी निवेदने, विकासकामांचा पाठपुरावा केला नाही तेवढा पाठपुरावा आमदार नितीन पवार करीत असतात. प्रत्येकवेळी भेटायला आले, की एखादा कागद पठ्याच्या हातात असतो, अशा शब्दात आमदार नितीन पवार (Nitin Pawar) यांच्या कामाची स्तुती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली.

Ajit Pawar with NCP leaders
एसटी कर्मचाऱ्यांची अवस्था गिरणी कामगारांसारखी होऊ नये

यावेळी श्री. पवार म्हणाले, दिवंगत ए. टी. पवारदेखील काही कामानिमित्त भेटायला आले, की दोन हात जोडून निवेदन देत असायचे. नितीन पवार हे त्यांच्या पुढे गेले. निवेदन तर देतात; पण एखादे काही आठवले की कागदावर लिहून देतो. एवढे काम करा, असे सांगत उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

Ajit Pawar with NCP leaders
"आजकालच्या पुढाऱ्यांच्या बापाचं काय जातं तेच समजत नाही"

उपमुख्यमंत्री यांनी काल कळवण मतदारसंघातील विविध कामांचे भूमीपूजन झाले. यावेळी त्यांनी आमदार पवार यांच्या कामकाजाचा पाठपुरावा, कार्यशैलीचे कौतुक केले. ते म्हणाले, मी शिवस्वराज्य यात्रेनिमित्त कळवणला आलो तेव्हा केलेल्या आवाहनाला जागून तुम्ही नितीन पवारांना विधानसभेत तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून पाठवले. आता ते तुमच्यासाठी धावताहेत. त्यामुळे तुम्ही त्यांची साथ सोडू नका.

ते म्हणाले, मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी दिवंगत ए. टी. पवार यांनी सर्वस्व पणाला लावून लोकप्रतिनिधी कसा असावा, याचा आदर्श राज्यात निर्माण केला. तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आमची भावकी निवडून दिली आहे. दिवंगत पवार यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांच्या मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्न सुरू आहे. नितीन पवार यांना कळवण- सुरगाण्यासाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही.

यावेळी विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार दिलीप बनकर, आमदार सरोज आहिरे, आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार जयंत जाधव, संजय चव्हाण, अपूर्व हिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, काँग्रेस जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे, माजी खासदार देवीदास पिंगळे, श्रीराम शेटे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार, अमृता पवार, नाना महाले, रंजन ठाकरे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com