Ajit Pawar Politics: संतोष बिडवईक जिल्हा बँकेचे नवे प्रशासक; त्यांना तरी कामाचे स्वातंत्र्य मिळेल?

Ajit Pawar; Santosh bidwai appointed as administrator for NDCC bank-आर्थिक अडचणीत सापडलेल्या नाशिक जिल्हा बँकेला मिळाले चौथे प्रशासक
Manikrao Kokate & Ajit Pawar
Manikrao Kokate & Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Nashik News: आर्थिक अडचणीत सापडलेल्या नाशिक जिल्हा बँकेच्या समस्या कमी होताना दिसत नाही. राजकीय हस्तक्षेप हा त्यातील मुख्य अडथळा आहे. त्यामुळे जिल्हा बँक अडचणीतून बाहेर कशी पडणार याची सगळ्यांना उत्सुकता आहे.

नाशिक जिल्हा बँकेच्या प्रशासक पदी आज जिल्हा सहकार उपनिबंधक संतोष बिडवईक यांची नियुक्ती झाली. मावळते प्रशासक प्रताप सिंग चव्हाण यांनी राज्य सहकारी बँकेने सुचविलेल्या अटी, व्याजातील सवलती यामुळे राजीनामा दिला होता. गेले आठवडाभर विविध पर्यायांवर विचार झाल्यानंतर आज अखेर बीडवाईक यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली.

Manikrao Kokate & Ajit Pawar
Sanjay Raut Politics: संजय राऊत यांचे मोठे विधान, महापालिका निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार!

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आर्थिक अडचणीत सापडली आहे. कर्जवसुलीत अनेक अडथळे आल्याने बँकेच्या ‘एनपीए’ मध्ये लक्षणीय वाढ झाली होती. नंतर नाबार्डने या बँकेला बँकिंग परवाना रद्द का करू नये अशी नोटीस बजावली होती. त्यानंतर बँक वाचविण्यासाठी प्रशासकीय स्तरावर धडपड सुरू झाली. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात बैठक झाली होती.

Manikrao Kokate & Ajit Pawar
BJP Politics: कंत्राटदारावर कारवाई ऐवजी भाजप नेते वृक्षप्रेमींवरच बरसले, काय आहे प्रकरण?

या बँकेवर २०२१ पासून प्रशासकीय अधिकारी कामकाज पहात आहेत. सहकार उपनिबंधक महंमद आरिफ यांची नियुक्ती झाली होती. नंतर अरुण कदम आणि तिसरे प्रशासक म्हणून राज्य सहकारी बँकेचे चव्हाण यांची नियुक्ती झाली होती. मात्र या सर्व प्रशासकांच्या कामकाजात राजकीय अडथळे निर्माण करण्यात आल्याने बँकेची स्थिती सुधारू शकली नाही.

मावळती प्रशासक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सक्तीची वसुली, मालमत्तांचा लिलाव, मोठ्या कर्जदारांवर कायदेशीर कारवाई असे विविध पर्याय स्वीकारण्यात आले होते. बँकेला तातडीने ९०० कोटी रुपयांच्या खेळत्या भांडवलाची आवश्यकता आहे. प्रशासकांनी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करून जोरदार काम सुरू केले होते. कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी रतन जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा केल्याने बँकेला दिशा मिळाली.

गेल्या महिन्यात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकांनी बँक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी पर्याय सुचवले. तीन महिने स्थगिती देण्यात आली होती. मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जिल्ह्यातील मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत व्याज सवलती देऊन फक्त मुद्दल वसुलीवर भर देण्याचे सुचित करण्यात आले होते. हा पर्याय बँकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यास पुरेसा नव्हता. त्यामुळे प्रशासकांनी राजीनामा दिल्याचे बोलले जाते.

या संकटाच्या मालिकेत जिल्हा बँक अडकली असताना चौथ्यांदा बिडवईक यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांच्यापुढे मोठे आर्थिक संकट आहे. काम करण्यासाठी त्यांना पुरेसे स्वातंत्र्य द्यावे लागेल. राजकीय हस्तक्षेप झाल्यास पुन्हा एकदा बँकेपुढे अस्तित्वाचे संकट निर्माण होऊ शकते.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com