Sharad Pawar Vs Ajit Pawar News : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला शरद पवारांकडून देवळालीत मोठा धक्का!

Deolali Constituency and NCP Politics : मतदार संघातील विविध गावांमधील अनेक नेते, पदाधिकाऱ्यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश
Deolali Constituency and NCP Politics
Deolali Constituency and NCP PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar NCP News: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांना एक धक्का बसला आहे. शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात देवळाली मतदारसंघातील विविध प्रमुख नेत्यांनी प्रवेश केला आहे.

यामध्ये मनसेचे तालुका उपाध्यक्ष प्रकाश धोंगडेंसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शशिकांत ढिकले, विलास सांगळे, जगदीश पेखळे, अनिल जगताप, केशव पोरजे, मनोहर खोडे, जयराम सहाणे, मोहन टिळे, संतोष कांडेकर, सोमनाथ घोलप, स्वप्नील साठे, देविदास चव्हाण आदी प्रमुख पदाधिकारी आहेत.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar), खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख राजेश टोपे, महबूब शेख, लक्ष्मण मंडले शहर अध्यक्ष गजानन शेलार, जिल्हा नेते गोकुळ पिंगळे, पुरुषोत्तम कडलग, शाम हिरे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. लक्ष्मण मंडले यांनी या कार्यकर्त्यांना फेटे बांधून त्यांचे स्वागत केले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, 'आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये अनेक लोक येण्यास उत्सुक आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज्यातील वातावरण बदलले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी महाविकास आघाडीचा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.'

Deolali Constituency and NCP Politics
Congress Politics : 'एमआयएम' नसल्यानेच धुळ्यात काँग्रेस जिंकली; काँग्रेस नेत्याची कबुली !

तसेच, 'हा उत्साह महायुतीच्या जनतेच्या विरोधी आणि महाराष्ट्राच्या विरोधी कामकाजाला मतदानातून उत्तर देईल. महाराष्ट्र हा जाणत्या आणि स्वाभिमानी लोकांचा प्रदेश आहे. सध्याचे सरकार मात्र तोडफोड करून राज्य करणारे आहे. त्यांना निश्चितच धडा शिकविला जाईल.' असंही जयंत पाटील(Jayant Patil) म्हणाले.

देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांची मतदार संघावरील पकड रोज ढिली होत आहे. प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्यांच्यापासून दुरावले आहेत. सातत्याने विविध नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करीत आहेत. असंही यावेळी सांगितलं गेलं.

Deolali Constituency and NCP Politics
Congress Meeting in Jalgaon : काँग्रेस गटबाजीने त्रस्त, बैठकीला जिल्हाध्यक्षांचीच दांडी

या पदाधिकाऱ्यांच्या प्रवेश सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी कडून देवळाली मतदारसंघासाठी जोरदार व्यूहरचना आखली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लक्ष्मण मंडले हे एक प्रमुख इच्छुक उमेदवार आहेत. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या इच्छुक उमेदवारांकडून देखील मतदारसंघात प्रचार दौरे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर रोज घडणाऱ्या राजकीय घडामोडी महायुतीची डोकेदुखी वाढविण्यात कारणीभूत ठरत आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com