Jalgaon Congress News : एकीकडे विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. दुसरीकडे जळगाव काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळली आहे. पदाधिकारी आणि नेत्यांमध्येच विसंवादाचे वारे जोरात वाहू लागले आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नुकतीच पक्षाने प्रतिभा शिंदे यांची नियुक्ती केली. या नियुक्तीमुळे त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी काँग्रेस कार्यालयात कार्यक्रम झाला.
मात्र या कार्यक्रमाला पक्षाच्या जिल्हाध्यक्षांसह सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. कार्यक्रमासाठी पदाधिकारीच आले नाहीत. त्यामुळे इतर कार्यकर्त्यांनी ही या कार्यक्रमापासून दूर रहाणेच पसंत केले.
यातून पक्षातील नेत्यांमधील विसंवाद आणि गटबाजीचे चित्र पुढे आले. कार्यक्रम झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांची संपर्क करण्याचा प्रयत्न झाला. कार्यक्रमाच्या आयोजकांचीही चांगलीच धावपळ उडाली. यामध्ये उपाध्यक्षपदी नियुक्त झालेल्या प्रतिभा शिंदे (Pratibha Shinde) यांचाही चांगलाच हिरमोड झाला.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर पक्षातील हे चित्र धक्कादायक असल्याने कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली. यासंदर्भात जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी काँग्रेस (Congress) कार्यालयात पक्षाचा कार्यक्रम आहे, याबाबत आपल्याला कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती.
जिल्हाध्यक्षांना विश्वासात न घेताच हा कार्यक्रम झाला. अशी प्रथा नाही. त्यामुळे याविषयी आयोजित केलेल्या कार्यक्रमाबाबत बहुतांशी पदाधिकार्यांनी अनभिज्ञता व्यक्त केली. पक्षाचे जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळी (Dnyaneshwar Koli) देखील कार्यक्रम आयोजित करणार्यांना चांगलेच फैलावर घेतले.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात एकोपा निर्माण करण्यासाठी प्रयत्न झाले होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना समन्वय असावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात सात जूनला आमदार शिरीष चौधरी (Shirish Chaoudhary) यांच्या उपस्थितीत पक्षाची बैठक झाली.
या बैठकीला सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या पार्श्वभूमीवर प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात दिसलेला गोंधळ पुन्हा होऊ नये अशी सूचना नेत्यांनी दिली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी जळगाव जिल्ह्यात सुरू आहे. महाविकास आघाडीचा महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे पक्षाच्या पदाधिकार्यांना नुकत्याच झालेल्या कार्यक्रमातून सावध होण्याचा संदेश मिळाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.