अकोला : अकोला जिल्ह्यातील जिल्हा परिषद गटांची मतमोजणी सुरु आहे. आतापर्यंतच्या अकरा जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये अटीतटीच्या लढतीत वंचित बहुजन आघाडीने पाच जागा जिंकल्या. दोन जागांवर त्यांचा बंडखोर विजयी झाला आहे. त्यामुळे त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत आघाडी घेतली आहे.
अकोला तालुक्यातील अकरा गटांचे निकाल असे, अंदुरा गट- मीना बावणे, शिर्ला गट- सुनील फाटकर, देगाव गट- राम गव्हाणकर आणि घुसर गट- शंकर इंगळे हे वंचित बहुजन आघाडीचे चार सदस्य विजयी झाले. या चारही ठिकाणी या उमेदवारांना सुरवातीपासून आघाडी होती. त्यांची लढत महाविकास आघाडीचे घटक असलेल्या पक्षांच्या उमेदवारांशी होती.
वंचित बहुजन आघाडीला पाच जागा मिळाल्या आहेत. त्यांचे विजयी उमेदवार असे, घुसर गटात शंकर इंगळे, देगाव गटात राम गव्हाणकर, शिर्ला गटात सुनील फाटकर, अंदुरा गटात मीना बावणे, कुरणखेड गटात सुशांत बोर्डे.
लाखपूरी गटात सम्राट डोंगरदिवे आणि अडगाव गटातील प्रमोदिनी गोपाल कोल्हे हे दोघे अपक्ष व वंचित आघाडीचे बंडखोर उमेदवार विजयी झाले आहेत.
अकोलखेड गटात शिवसेनेचे जगन निचळ विजयी झाले. बपोरी गटात माया कावरे (भाजप), कानशिवणी गटात किरण शिवा मोहोड आणि दगडपारवा गटात सुमन गावंडे हे दोघे राष्ट्रवादी काँगेसचे उमेदवार विजयी झाले.
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.