BJP Internal Conflict : भाजपमध्ये अंतर्गत बंड; नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे गटनेतेपदावरून हटवले, वैभव पिचड यांच्यासमोरील आव्हाने वाढली

BJP replaces Akole group leader amid internal political rift : अकोले नगरपंचायतीत भाजपमधील अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत. नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांना गटनेतेपदावरून हटवून तमन्ना मोसिन शेख यांची निवड करण्यात आली.
BJP Internal Conflict
BJP Internal ConflictSarkarnama
Published on
Updated on

Akole Nagar Panchayat : देशापासून राज्यापर्यंत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत सत्तेत असलेल्या भाजपमध्ये विविध ठिकाणी अंतर्गत मतभेद समोर येत आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले नगरपंचायतीतही अशाच घडामोडींनी वेग घेतला असून, त्याचा परिणाम स्थानिक राजकारणावर दिसू लागला आहे.

अकोले नगरपंचायतीचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांना भाजपच्या (BJP) गटनेतेपदावरून हटविण्यात आले आहे. त्यांच्या जागी तमन्ना मोसिन शेख यांची एकमताने गटनेतेपदी निवड करण्यात आली. या निर्णयामुळे अकोलेतील भाजपमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

अकोले नगरपंचायतीत (Municipal) 17 सदस्यांपैकी 12 नगरसेवक भाजपचे आहेत. ही सत्ता माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली आहे. मात्र, या 12 नगरसेवकांपैकी बहुसंख्य सदस्य नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे आणि उपनगराध्यक्ष शरद नवले यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त करत असल्याचे सांगितले जात आहे.

BJP Internal Conflict
Ram Mandir employees resign : राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात नवे वळण; 23 कर्मचाऱ्यांचे सामूहिक राजीनामे, 30 बँक खाती गोठवली

गेल्या दीड वर्षापासून काही नगरसेवकांनी वडजे आणि नवले यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे अनेकदा केली होती. मात्र, या मागणीवर कोणताही निर्णय न झाल्याने नाराजी अधिक तीव्र झाली. त्यानंतर काही सत्ताधारी नगरसेवकांनीच नगराध्यक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत भूमिका अधिक आक्रमक केली.

BJP Internal Conflict
Durga Tambe Privilege Motion : दुर्गा तांबेंच्या वक्तव्यावरून वाद; आमदार अमोल खताळ यांचे विधानसभेत हक्कभंग कारवाईसाठी निवेदन

बाळासाहेब वडजे गटनेतेपदावरून हटवले

या पार्श्वभूमीवर भाजपप्रणीत अकोले शहर आघाडीच्या नऊ सदस्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत बाळासाहेब वडजे यांना गटनेतेपदावरून हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आणि तमन्ना मोसिन शेख यांची नवीन गटनेते म्हणून निवड करण्यात आली.

जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी

यानंतर हा विषय जिल्हाधिकाऱ्यांकडे गेला. झालेल्या सुनावणीनंतर तमन्ना मोसिन शेख यांच्या गटनेतेपदावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सुनावणीवेळी प्रतिभा मानकर, सागर चौधरी, हितेश कुंभार, सोनाली नाईकवाडी, तमन्ना शेख, जनाबाई मोहिते, माधुरी शेणकर आणि कविता शेळके उपस्थित होते.

पुढील वर्षी निवडणूक

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे आणि उपनगराध्यक्ष शरद नवले न्यायालयात आव्हान देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात जाण्याची शक्यता असून, पुढील वर्षी होणाऱ्या अकोले नगरपंचायतीच्या निवडणुकीवर या वादाचे राजकीय परिणाम दिसू शकतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com