Nagar Urban Bank News : ‘अर्बन बँक’ घोटाळ्यात पुण्यातील कर्जदाराला अटक, बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतलं मोठं कर्ज

Nagar Urban Bank Loan Scam : नगर अर्बन बँकेच्या 291 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी नगर पोलिस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेने पुण्यातील कर्जदाराला अटक केली. या घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली आहे.
Nagar Urban cooperative bank
Nagar Urban cooperative bankSarkarnama

Nagar News : नगर अर्बन बँकेच्या 291 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी (Nagar Urban Bank Loan Scam) नगर पोलिस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेने आणखी एका कर्जदाराला अटक केली. अक्षय राजेंद्र लुणावत (वय 34, रा. उंड्री, पुणे) असे, या कर्जदाराचे नाव आहे. पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या पथकाने पुण्यातील राहत्या घरातून त्याला ताब्यात घेतले. अक्षय लुणावत याला न्यायालयाने एक जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली आहे.

पुणे (Pune) येथील अक्षय लुणावत हा कल्पद्रुमा ज्वेलर्सचा संचालक असून त्याच्या नावावर आठ कोटी रूपयांपेक्षा जास्त कर्ज आहे. त्याने बँकेचे अधिकारी, पदाधिकारी व संचालक यांच्याशी संगनमत करून कल्पद्रुमा ज्वेलस अ‍ॅण्ड जेम्स या कंपनीच्या नावे बनावट (Fraud) कागदपत्रांच्या आधारे तारण मालमत्तेचे वाढीव मुल्यांकन दाखवून वेळोवेळी मोठ्या रकमांचे कर्ज घेतले. या कर्ज रकमेचा गैरवापर केला व कर्ज रकमेची परतफेड केली नाही. या कर्ज रकमेच्या वापराबाबत तपास करून रक्कम हस्तगत करायची आहे, असे नगर पोलिसांनी न्यायालयात म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nagar Urban cooperative bank
Nashik Income Tax Raid: शोभेच्या फर्निचरमध्ये सापडल्या तब्बल 26 कोटींच्या नोटा!

अक्षय लुणावत याने सन 2015 मध्ये घेतलेल्या सहा कोटी रूपयांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी नगर अर्बन बँकेचे (Nagar Urban Bank) कर्जदार टेरासॉफ्ट टेक्नोलॉजी या फर्मच्या नावाने मंजुर कर्जाची रक्कम वापरण्यात आली आहे. टेरासॉफ्ट टेक्नोलॉजीच्या खात्यातून तीन कोटी 5 लाख रूपये माऊली ट्रेडर्स यांच्या मर्चंटस् बँकेतील खात्यात वर्ग केली व तेथून रोख स्वरूपात काढून ती रक्कम नगर अर्बन बँकेत जमा करून त्याद्वारे त्याचे कर्ज निरंक केल्याचे दर्शवले आहे. तसेच, अक्षय लुणावत याच्या खात्यातून नगर अर्बन बँकेचे संचालक नवनीत सुरपुरीया आणि इतरांच्या खात्यावर वेळोवेळी रकमा वर्ग करण्यात आल्या आहेत. या रकमा बनावट कागदपत्राच्या आधारे घेतलेल्या कर्जापोटी त्याने संचालकांना दिल्या असण्याची शक्यता आहे.

अर्बन घोटाळ्यात आतापर्यंत प्रदीप जगन्नाथ पाटील, राजेंद्र शांतीलाल लुणिया, मनेष साठे, अनिल कोठारी (सर्व रा. नगर), अशोक माधवलाल कटारिया (रा. टाकळे ढोकेश्र्वर, पारनेर), शंकर घनशामदास अंदानी (रा. नगर), मनोज वंसतलाल फिरोदिया (रा.नगर), प्रवीण सुरेश लहारे (रा. केडगाव), अविनाश प्रभाकर वैकर (रा. नगर), अमित वल्लभराय पंडित (रा. संगमनेर) या दहा जणांना नगर पोलिसांनी (Nagar Police) पूर्वी अटक केली आहे. हे दहा जण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

Nagar Urban cooperative bank
Nagar Unauthorized Hoardings : विनापरवाना होर्डिंग्जविरोधात नगर मनपा 'Action Mode'वर ; सुरू केली थेट 'JCB' कारवाई!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com