Nagar Unauthorized Hoardings : विनापरवाना होर्डिंग्जविरोधात नगर मनपा 'Action Mode'वर ; सुरू केली थेट 'JCB' कारवाई!

Ahmednagar Municipality Action : पहिल्या टप्प्यात 83 विनापरवाना होर्डिंग्ज तोडले जाणार आहेत.
Nagar Unauthorized Hoardings : विनापरवाना होर्डिंग्जविरोधात नगर मनपा 'Action Mode'वर ; सुरू केली थेट 'JCB' कारवाई!
Sarkarnama

Ahmednagar News : परवानगी न घेता दिमाखात झळकत असलेल्या होर्डिंग्जला महापालिकेने अखेर आजपासून (मंगळवार) दणका देण्यास सुरूवात केली. नगर-स्टेशन रस्त्यावरील तीन बेकायदा होर्डिंग्जपैकी दोन होर्डिंग्ज महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने जेसीबी लावून जमीनदोस्त केले.

दरम्यान, सोमवारी (27 मे) सुरू होणारी ही मोहीम एक दिवस उशिराने सुरू झाल्याने कारवाई होणार की नाही, अशी शंका होती. पण ती फोल ठरवत नगर महापालिकेने(Ahmednagar Municipality) बेकायदा होर्डिंग्जला दणका देणे सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यात 83 विनापरवाना होर्डिंग्ज तोडले जाणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nagar Unauthorized Hoardings : विनापरवाना होर्डिंग्जविरोधात नगर मनपा 'Action Mode'वर ; सुरू केली थेट 'JCB' कारवाई!
Ahmednagar News : पाचशे वर्षांच्या परंपरेला तडा जाणार? अहमदनगर ते अहिल्यानगर; नामांतरानंतरही दोन स्थापना दिवस...

मुंबईतील घाटकोपर(Ghatkopar) येथे भलेमोठे होर्डिंग्ज वादळामुळे पेट्रोल पंपावर कोसळल्याने त्याखाली 17 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यभरातील सर्वच शहरांतील होर्डिंग्ज व त्यांची स्थिती ऐरणीवर आली. नगर महापालिकेने शहरात फिरून सर्वच होर्डिंग्जची खानेसुमारी केली. नगर शहरात 384 अधिकृत होर्डिंग्ज साईटस आहेत आणि त्या महापालिकेने अंतिम केल्या आहेत.

मात्र, जेव्हा सर्वच होर्डिंग्जची माहिती घेणे सुरू केले, तेव्हा तब्बल 83 होर्डिंग्ज बेकायदा उभारले असल्याचे आढळले. या होर्डिंग्जसाठी महापालिकेची कोणतीही परवानगी घेतली गेलेली नाही वा त्यांचे नियमाप्रमाणे असणारे शुल्कही भरण्याची तसदी घेतलेली नव्हती. याशिवाय परवानगी घेऊन उभारण्यात आलेल्या 44 होर्डिंग्जने परवानगी मुदत संपल्यावर ती वाढवून घेण्याचे व त्यासाठीचे शुल्क भरण्याचेही कष्ट घेतलेले नव्हते.

Nagar Unauthorized Hoardings : विनापरवाना होर्डिंग्जविरोधात नगर मनपा 'Action Mode'वर ; सुरू केली थेट 'JCB' कारवाई!
Pune Hit And Run Case : पुण्यातील 'हिट अ‍ॅण्ड रन'प्रकरणात 'बसप'ची मोठी मागणी...

राजकीय दबावाची चर्चा -

या दोन्ही मिळून 127 होर्डिंग्जला मनपाला नोटिसा पाठवल्या. मात्र, त्यावर त्यांच्याकडून समाधानकारक खुलासे आले नसल्याने अखेर महापालिकेने या होर्डिंग्जवर हातोड्याचे दणके देऊन ते जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला. महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील पथकाचे प्रमुख आदित्य बल्लाळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मंगळवारपासून ही कारवाई सुरू केली. सोमवारपासून अनधिकृत होर्डिंग्ज उतरवण्याची कारवाई करण्याचे नियोजन करण्यात आले होते.

होर्डिंग्जवर कारवाई होत नसल्याने राजकीय दबावाची चर्चा होती. पण तसे काही नसल्याचा खुलासा महापालिकेद्वारे केला गेला. पथकाने सोमवारी क्लेरा ब्रूस मैदानावर कारवाईचे नियोजन केले होते. मात्र, होर्डिंग्ज मालकांचा विरोध व राजकीय दबावामुळे ही कारवाई बारगळल्याचे सांगितले जात होते. मात्र, आज मंगळवारपासून ही कारवाई सुरू झाल्याने सारे विरोध व दबाव झुगारून महापालिकेने कडक भूमिका स्वीकारल्याचे दिसू लागले आहे.

आदेश अन् प्रभाग अधिकारी रजेवर... -

होर्डिंग्जला परवानगी देताना राज्य सरकारने निश्चित केलेल्या नियमांचे पालन केले आहे का? परवानगीनुसार त्याच आकाराचे होर्डिंग्ज आहे की मोठे आहे? होर्डिंग्ज योग् पद्धतीने राज्य सरकारने ठरवून दिलेल्या निकषानुसार उभारले आहेत का? इमारतीवर होर्डिंग्ज असल्यास त्या इमारतीचे व ज्यावर होर्डिंग्ज उभारले आहे, त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले आहे का? आदी विविध मुद्यांवर तपासणी करण्याचे आदेश प्रभाग अधिकार्‍यांना देण्यात आले होते. त्यानंतर काही प्रभाग अधिकारी रजेवर गेल्याने त्यामागील नेमक्या कारणांचीही चर्चा सुरू आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com