Dhanagar v/s Trible reservation : ‘एका मेंढराला किती महत्त्व देता, आम्ही २५ जण आहोत’

Trible reservation - नरहरी झिरवाळ यांनी गोपीचंद पडळकर यांचे नाव न घेता कठोर टीका केली.
Narhari Zirwal
Narhari ZirwalSarkarnama
Published on
Updated on

Nashik Trible Morcha : आम्ही शांत बसलेलो नाही. लढतो आहोत. कोणत्याही स्थितीत धनगर समाजाला आदिवासींच्या आरक्षणात वाटेकरू होऊ देणार नाही. एक मेंढरू विधिमंडळात आले, अन् आरक्षणावर बोलू लागले, बोलू द्या आम्ही पंचवीस आहोत, असे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सांगितले. (Trible leaders opposed Dhangar community reservation from Trible class)

धनगर समाजाच्या आदिवासी (Trible) गटातील आरक्षणाच्या मागणीच्या विरोधात आदिवासी समाज बांधवांनी शक्तिप्रदर्शन केले.(Nashik) या वेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी इशारा दिला.

Narhari Zirwal
Drug Mafia Lalit Patil : धनुष्यबाण शिंदे यांनी पळवला...अचूक बाण मात्र अंधारे यांनीच मारला!

या वेळी झिरवाळ म्हणाले, धनगर समाजाचा एक आमदार विधान परिषदेत आला आणि धनगर समाजाच्या आरक्षणावर बोलू लागला म्हणून त्याला किती महत्त्व द्यायचे. आम्ही सर्व पंचवीस आमदार या विषयावर संघटित आहोत. कोणत्याही स्थितीत धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण मिळू देणार नाही. आम्ही या विषयावर रडत बसणार नाही, लढा देऊ. वेळ पडली तर आम्ही सर्व पंचवीस आमदार आमच्या पक्षनेत्यांकडे राजीनामे देऊ. समाजाने निश्चिंत राहावे.

आज या प्रश्नावर उलगुलान मोर्चा काढण्यात आला. या पार्श्‍वभूमीवर शहर पोलिस वाहतूक शाखेतर्फे मोर्चा मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात येणाऱ्यांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन वाहतूक शाखेने केले होते. याबाबत अधिसूचना जारी केली होती.

या वेळी आमदार मंजुळा गावित, नितीन पवार, किरण महामटे, आमदार हिरामण खोसकर, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, माजी आमदार जे. पी. गावित, शिवराम झोले यांसह विविध लोकप्रतिनिधी त्यात सहभागी झाले. समितीचे अशोक बागूल, राम चौरे, के. के. गांगुर्डे, देवा वाटारे, राजाभाऊ वागळे, जयवंत गारे, विजय पवार, पंडित बहिरम, नामदेव बागूल आदींनी या मोर्चाचे संयोजन केले.

Narhari Zirwal
PCMC News : अजितदादांचा गड चोहोबाजूंनी घेरला; रोहित पवार, जयंत पाटलानंतर आता सुप्रियाताई मैदानात

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com