PCMC News : अजितदादांचा गड चोहोबाजूंनी घेरला; रोहित पवार, जयंत पाटलानंतर आता सुप्रियाताई मैदानात

Supriya Sule News : खासदार सुप्रिया सुळेही नवरात्रात पिंपरी-चिंचवडमध्ये येणार आहेत
Supriya Sule News
Supriya Sule NewsSarkarnama
Published on
Updated on

Pimpri-Chinchwad News : बंडखोरी करीत राज्यातील भाजप-शिवसेनेच्या सत्तेत सामील झालेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार यांचे प्रिय शहर पिंपरी-चिंचवड हे आता शरद पवार गटाने चोहोबाजूंनी घेरण्यास सुरुवात केली आहे. तरुण आमदार रोहित पवारांवर त्याची जबाबदारी दिल्यानंतर शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तेथे एन्ट्री मारली. आता खासदार सुप्रिया सुळेही (Supriya Sule) नवरात्रात येणार आहेत.

रोहित पवार (Rohit Pawar) यांना १५ दिवसांनी उद्योगनगरीला भेट देण्यास जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सांगितले आहे. ते स्वत: एकदा येऊन गेले आहेत. शरद पवारांनीसुद्धा एक कार्यक्रम घेतला. आता पुन्हा शहर कार्यालय उद्घाटनासाठी पाटील येणार असून, त्यावेळी ते मेळावा घेणार आहेत, तर पुढील महिन्यात शरद पवारांची जाहीर सभा होणार आहे. या दोन्ही वेळेस अनेकांची घरवापसी होईल, असा दावा शरद पवार राष्ट्रवादीच्या शहरातील जबाबदार पदाधिकाऱ्याने केला आहे.

Supriya Sule News
Rajasthan Assembly Election : सत्ता कुणाचीही असो राजस्थानमध्ये 20 वर्षांपासून गेहलोत अन् वसुंधरा राजेंचाच जलवा

दरम्यान, यानंतर महिला मतदार आणि पक्षाच्या महिला पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांसाठी खासदार सुळे आता महिन्यातून एकदा उद्योगनगरीत येणार आहेत. यापूर्वी त्या येत नव्हत्या. मात्र, बदलत्या राजकीय परिस्थितीत त्यांनी आता जातीने लक्ष घालायचे ठरविले आहे. महिलांविषयक बाबी त्या हाताळणार आहेत.

खासदार सुळे यांची एन्ट्री नवरात्रात महिला मेळाव्याने पिंपरी-चिंचवडमध्ये होणार आहे. त्याला शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी आज 'सरकारनामा'शी बोलताना दुजोरा दिला. कारण त्यासाठीच त्यांना आज सुळेंनी पुण्यातील आपल्या कार्यालयात बोलावून घेतले होते. त्यामुळे त्यांनी पदाधिकाऱ्यांसह पुण्यात जाऊन सुप्रियाताईंची भेट घेतली. या वेळी त्यांच्या कामाची स्तुती सुळेंनी केली.

तसेच शहरात महिला मेळावाही घेण्यास सांगितले. त्यामुळे उद्या महिला शहराध्यक्षा ज्योती निंबाळकर यांच्याशी चर्चा करून नवरात्रात सुप्रियाताईंचा शहरात मेळावा घेऊ, असे कामठे यांनी सांगितले. दरम्यान, शरद पवार (Sharad Pawar) गटाची शहरात जोरदार तयारी सुरू असताना दुसरीकडे त्या तुलनेत अजित पवार राष्ट्रवादीमध्ये शांतता आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Supriya Sule News
Heramb Kulkarni Attack : काँग्रेसच्या नगर अध्यक्षांचे धाडसच वेगळे; कुलकर्णींवरच्या हल्ल्यानंतर थेट स्टिंग ऑपरेशनच केले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com