Karjat Nagar Panchayat
Karjat Nagar PanchayatSarkarnama

Karjat Nagar Panchayat : कर्जत नगरपंचायतीचे सर्व पदाधिकारी प्रजासत्ताक दिनालाच उपोषण करणार

Karjat Tahsil Protest News : यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह पदाधिकाऱ्यांचे अनेक कामे खोळंबली आहे.
Published on

Karjat News : कर्जत नगरपंचायतीला केवळ राजकीय द्वेषापोटी कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळत नसून यामुळे सर्वसामान्य नागरिकांची अनेक कामे खोळंबली गेली आहे. मागील दीड वर्षांपासून मुख्याधिकारी पदासह अनेक महत्वाची पदे रिक्त आहे.ही पदे तत्काळ न भरल्यास कर्जत नगरपंचायतीचे सर्व पदाधिकारी प्रजासत्ताक दिनालाच तहसील कार्यालयाच्या आवारात उपोषण करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादीचे गटनेते संतोष मेहेत्रे यांनी दिला.

Karjat Nagar Panchayat
MLA Sunil Shelke: मावळात 'महायुती'ची वज्रमूठ नाहीच; आमदार शेळकेंनी युतीचा धर्म पाळला, पण...

कर्जत नगरपंचायतीमध्ये मागील दीड वर्षांपासून मुख्याधिकारी पद रिक्त असून त्याचा भार प्रभारी अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आला आहे. प्रभारी मुख्याधिकारी कर्जत (Karjat) नगरपंचायतीकडे पंधरा-पंधरा दिवस फिरकत नाही. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह पदाधिकाऱ्यांचे अनेक कामे खोळंबली आहे.

तसेच नगरपंचायत हद्दीतील विकासकामे देखील प्रलंबित पडले आहे. याच पार्श्वभूमीवर 1 सप्टेंबर 2023 रोजी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या कार्यालयासमोर सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी आमरण उपोषण केले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी आपल्या तीव्र भावना महाराष्ट्र शासनास कळवू असे लेखी आश्वासन दिले असताना आजमितीस देखील कायमस्वरूपी मुख्याधिकारी कर्जत नगरपंचायतीला देण्यात आला नाही, ही शोकांतिका आहे. मुख्याधिकारी पदासह अभियंता, लेखापाल, नगर रचना सहायक लेखा परीक्षक आदी पदे रिक्त आहे. वरील रिक्त पदामुळे शहरातील नागरिकांना अनेक प्रशासकीय कामात अडचणी निर्माण होत असून नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.

वास्तविक पाहता कर्जत नगरपंचायतीने माझी वसुंधरा स्पर्धेत प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावला असून त्याची केवळ विरोधकांच्या राजकीय द्वेषापोटी दयनीय अवस्था झाली आहे. वरील पदे तात्काळ न भरल्यास देशाच्या प्रजासत्ताक दिनीच 26 जानेवारीला आमरण उपोषण करण्याचा इशारा सत्ताधारी राष्ट्रवादीचे गटनेते संतोष मेहेत्रे यांच्यासह नगराध्यक्षा - उपनगराध्यक्षा आणि सर्व नगरसेवक-नगरसेविका यांच्या स्वाक्षरीचे निवेदन नायब तहसीलदार प्रकाश बुरुंगले यांना दिले. यावेळी नगरसेवक भास्कर भैलुमे, प्रसाद ढोकरीकर, राजेंद्र पवार, सुनील शेलार, लाला शेळके, रवी सुपेकर उपस्थित होते.

Karjat Nagar Panchayat
Ajit Pawar : 'पंतप्रधान मोदींनी दिलेला शब्द पाळला; पण...'; अजित पवारांनी विरोधकांनी सुनावलं

आमदार राम शिंदेंवर राष्ट्रवादीचा आरोप

कर्जत नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता आहे.भाजपाच्या ताब्यातील कर्जत नगरपंचायत आमदार रोहित पवार यांनी ताब्यात घेत सत्तांतर घडवले होते.17 पैकी भाजपाला अवघ्या 2 जागेवर विजय मिळवता आला होता. याचे शल्य आमदार राम शिंदेंना आहे.केवळ राजकीय द्वेष समोर ठेवत राम शिंदे कर्जत नगरपंचायतीला मागील दीड वर्षांपासून मुख्याधिकारी मिळून देत नसल्याचा अप्रत्यक्ष आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केला.

(Edited By Deepak Kulkarni)

Karjat Nagar Panchayat
Ajit Pawar : 'पंतप्रधान मोदींनी दिलेला शब्द पाळला; पण...'; अजित पवारांनी विरोधकांनी सुनावलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com