Teachers Constituency 2024 : धक्कादायक! मतदानासाठी शेतमजूरही झाले शिक्षक?

Nashik Teachers Constituency 2024 : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक विविध कारणांनी चर्चेत आहे. आता या निवडणुकीच्या मतदार यादीतील बोगस नावांचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
Nashik Teachers Constituency
Nashik Teachers ConstituencySarkarnama
Published on
Updated on

Nashik News, 19 June : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक विविध कारणांनी चर्चेत आहे. आता या निवडणुकीच्या मतदार यादीतील बोगस नावांचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

शिक्षक मतदारसंघाच्या यादीत केवळ बिगर सरकारी संस्थांतील आणि पूर्णपणे ज्ञानदानाचे काम करणाऱ्या शिक्षकांचा समावेश असतो. त्यात महापालिका, जिल्हा परिषद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश नसतो. अशी नावे मतदार यादीत समाविष्ट केली जात नाहीत. (Nashik Teachers Constituency 2024)

मात्र कार्यकर्ते मतदार यादीतील नावांचा शोध घेण्यासाठी घरोघरी गेले असता अनेक नावे बोगस असल्याचे आढळले आहे. सायखेडा भागात अनेक शेतकरी शिक्षक (Teacher) असल्याचे दाखवले आहेत. एवढेच नव्हे तर शेतमजूर, नववी पास आणि शिक्षणाशी काहीही संबंध नसलेल्या व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शिक्षक मतदार यादीत समावेश आहे.

Nashik Teachers Constituency
Maratha Reservation : जरांगे, भुजबळ, मुंडेंना पत्र लिहित मराठा आरक्षणासाठी तरुणानं संपवलं जीवन

मतदार यादीतच बोगस नावे असल्याने खरे शिक्षक मतदानापासून वंचित राहण्याची भीती आहे. निवडून येणारा आमदार प्रतिनिधी शिक्षकांचा की बोगस मतदारांचा हा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो. या संदर्भात उमेदवारांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. या मतदार यादीचा अभ्यास सुरू असून त्यावर कायदेशीर सल्ला घेण्यात येणार आहे.

शिक्षक मतदारसंघासाठी नोंदणी करताना संबंधित शिक्षकाचे प्रतिज्ञापत्र घेण्यात येते. त्यानंतर संबंधित शिक्षक ज्या संस्थेत काम करतो त्या शाळेचे मुख्यध्यापक त्याचा अर्ज मंजूर करतात. त्यानंतरच संबंधितांचे नाव मतदार यादीत समाविष्ट केले जाते. त्यामुळे बोगस नावे आढळल्यास त्याला प्राध्यापकांना देखील जबाबदार धरले जाणार आहे.

Nashik Teachers Constituency
Legislative Council Election : महायुती की मविआ कोण ठरणार 'किंग'; दादा अन् शिंदेंचे आमदार फुटणार?

या निवडणुकीत अनेक गैरप्रकार आढळून आले आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवाराशी नाम साधर्म्य असलेले डमी उमेदवार उभे करण्यात आले आहेत. नाशिकच्या (Nashik) एका वादग्रस्त उमेदवाराच्या संस्थेतील कोल्हे आडनाव असलेले दोघे उमेदवार आहेत. याबाबत अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी आरोप केला आहे. निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आल्याने अनेक गैरप्रकार उघडकीस येऊ लागले आहेत. त्यामुळे ही निवडणूक वेगळ्याच कारणाने गाजण्याची चिन्हे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com