Maratha Reservation : जरांगे, भुजबळ, मुंडेंना पत्र लिहित मराठा आरक्षणासाठी तरुणानं संपवलं जीवन

Prasad Dethe News : बार्शीतील प्रसाद देठे हे पुण्यातील खासगी कंपनीत काम करत होते. त्यासह ते मराठा आरक्षणाच्या चळवळीत सक्रियही होते.
Prasad Dethe
Prasad Dethesarkarnama
Published on
Updated on

Maratha Aarakshan : मराठासह ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. यातच मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. प्रसाद देठे, असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे.

मूळचे बार्शीतील रहिवाशी असलेले प्रसाद देठे (Prasad Dethe) पुण्यातील एका खासगी कंपनीत काम करत होते. त्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी सकाळी आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी देठे यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यात आपल्या व्यथा देठे यांनी मांडल्या आहेत.

देठेंच्या जाण्यानं हळहळ

फक्त 'मराठा आरक्षण' मिळावे म्हणून आत्महत्या करत असल्याचं देठेंनी चिठ्ठीत सांगितलं आहे. 'माझ्या आत्महत्येला कुणीही जबाबदार नाही,' असा उल्लेखही देठेंनी केला आहे. देठेंच्या आत्महत्येनंतर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

चिठ्ठीत काय?

जयोस्तु मराठा

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे. पंकजाताई, भुजबळ साहेब, हाके, शेंडगे, तायवाडे, टी.पी. मुंडे, गायकवाड आम्हाला आरक्षण मिळू द्या, विनंती आहे तुम्हाला. हात थरथरतोय म्हणून अक्षर असं आहे. माझ्या मृत्यूला कोणी जबाबदार नाही. मी स्वखुशीने मरत आहे.

जरांगे साहेब आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका. विनंती आहे तुम्हाला. माझं तुम्हाला पटणार नाही, पण मी पूर्ण हताश झालोय. चिऊ मला माफ कर. लेकरांची काळजी घे. धीट राहा. मला माफ करा. तुमचाच प्रसाद.

prasad dethe letter
prasad dethe lettersarkarnama

प्रसाद देठे हे सोशल मीडियावर सक्रिय होते. ते सतत सोशल मीडियावर मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) समर्थनार्थ पोस्ट टाकत होते. त्यांनी अनेकदा फेसबुक लाईव्ह करून मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका मांडली होती.

Prasad Dethe
Video Manoj Jarange Patil : मराठे ओबीसीतूनच आरक्षण घेणार, जरांगे पाटील कडाडले !

आत्महत्या करण्यापूर्वी प्रसाद देठे यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. त्यात, "जरांगे-पाटील जिंदाबाद, लाख मेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, आणि मराठा समाजाचा सध्याचा पोशिंदा फक्त आमचे जरांगे पाटील," असं म्हटलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com