Jalgaon APMC Election : शिंदे गटाकडून बोगस मतदान सुरु असल्याचा आरोप; जळगावात मतदान केंद्रावर राडा

Jalgaon Market Commitee News : मतदान रोखण्याची मागणी...
Jalgaon APMC Election
Jalgaon APMC ElectionSarkarnama

कैलास शिंदे -

Jalgaon : राज्यात एकूण 253 बाजार समित्यांपैकी 18 बाजार समित्या बिनविरोध झाल्या आहेत. राज्यात आज 147 तर उर्वरित 88 बाजार समित्यांची निवडणूक 30 तारखेला होणार आहे. मात्र, याचदरम्यान, जळगाव जिल्ह्यातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. या ठिकाणी शिंदे गटाकडून बोगस मतदान होत असल्याची आरोप करण्यात आला आहे. यानंतर जळगावात जोरदार राडा पाहायला मिळाला.

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकपदाच्या निवडणुकीसाठी आज(दि.२८) मतदान होत आहे. याचवेळी शहरातील नूतन मराठा महाविद्यालयात मतदान केंद्रावर मोठा राडा झाल्यानं तणाव वाढला आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. ( APMC Elections News)बोगस मतदान होत असल्याच्या बोगस मतदान होत असल्याच्या वादातून नूतन मराठा मतदान केंद्रावर गोंधळ झाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे वातावरणातील तणाव निवळला.

Jalgaon APMC Election
APMC Elections News : बाजार समितीच्या निवडणुकीत राडा ; दोन गट भिडले, भाजपची बस थेट मतदान केंद्रावर..

जळगाव बाजार समिती हमाल मापडी मतदारसंघातील उमेदवार देवेन सपकाळे यांनी नूतन मराठा केंद्रावर शिंदे गटाकडून बोगस मतदान होत असल्याची हरकत घेतली.यावरून मतदान केंद्रावर गोंधळ झाला. मतदान रोखण्याची त्यांनी मागणी केली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने शांतता झाली.

Jalgaon APMC Election
Amit Shah News : गृहमंत्री अमित शाहांनी आपला नियोजित नागपूर दौरा ऐनवेळी रद्द का केला? 'ही' आहेत कारणं...

याबाबत अधिकारी म्हणाले, या मतदारांची नावे यादीत आहेत. हरकत घेण्याच्या मुदतीत कोणीही हरकत घेतली नाही. त्यामुळे त्यांना मतदान करण्याचा अधिकार आहे. तरीही रितसर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे ते तक्रार करू शकतात. आता मतदान शांततेत सुरू आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com