APMC Elections News: बाजार समितीच्या निवडणुकीत राडा; दोन गट भिडले, भाजपची बस थेट मतदान केंद्रावर..

APMC Election Live Updates: भाजपची बस थेट मतदान केंद्रावर..
APMC Election Live Updates
APMC Election Live Updates Sarkarnama

Maharashtra APMC Election Live Updates : राज्यात एकूण 253 बाजार समित्यांपैकी 18 बाजारसमित्या बिनविरोध झाल्या आहेत. तर उर्वरीत 235 बाजार समित्यांसाठी आज आणि 30 तारखेला निवडणूक होणार आहे. 30 तारखेला 88 बाजार समित्यांची निवडणूक होणार आहे. राज्यात आज 147 बाजार समित्यांची निवडणूक होत आहे.

मुदत संपलेल्या राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आज (२८ एप्रिल)होत आहे. मतदानास सुरवात झाली आहे. अहमदनगर तालुका बाजार समितीच्या मतदानावेळी दोन गट समोर समोर भिडल्याचे माहिती समोर येत आहे.

भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले समर्थक आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये बचाबाची झाल्याने याठिकाणी तणावाचे वातावरण आहे. (Political Short Videos)

मतदारांना घेऊन येणारी भाजपची बस थेट मतदान केंद्रावर आणल्याने हा वाद झाला. भाजप आणि महाविकास आघाडीच्या दोन गट एकमेकांच्या समोरासमोर आल्याने शाब्दीक युद्ध रंगले.

APMC Election Live Updates
Karnataka Election 2023 : महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसचा मोठा डाव ; सत्ता आल्यास...

जळगावमध्येही बोगस मतदान ?

जळगाव जिल्ह्यात शिंदे गटाकडून बोगस मतदान होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर जळगावात जोरदार राडा पाहायला मिळाला. जळगाव शहरातील नूतन मराठा महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर हा प्रकार झाला. या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

APMC Election Live Updates
JDS Manifesto For Karnataka Election : गर्भवतींना JDS देणार सहा हजार रुपये मानधन, अंगणवाडी सेविकांच्या वेतनात वाढ..

गुरुवारी सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या सचिवांनी सुधारित अधिसूचना काढून पुन्हा दोन संस्थांच्या सदस्यांना दोन वेळा मतदान करण्याचे अधिकार बहाल केले आहेत.

औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी (२८ एप्रिल) रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे. सहकारी प्रधिकरणाने निर्णय मागे घेतल्यामुळे आता याचिकेवरील सुनावणीची औपचारिकताच राहिली आहे.

मतदानाच्या दोन दिवसांपूर्वी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या सचिवांनी दोन संस्थांचे सदस्य असलेल्या नागरिकास एकच मतदान करण्याचा अधिकार बहाल करणारी अधिसूचना काढण्यात आली आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com