Ajit Pawar, Rohit Pawar and Ram Shinde : अजित पवार 'किंगमेकर', आघाडीत पवार इज 'पाॅवर' अन् महायुतीच्या गर्दीत 'राम शिंदे'; काय आहे गणित...

Politics In Coalition And Alliance For Karjat Jamkhed Assembly : विधानसभा निवडणुकीसाठी कर्जत-जामखेड मतदारसंघातून महायुतीकडे गर्दी दिसते आहे. महाविकास आघाडीकडून आमदार रोहित पवार पुन्हा मैदानात असतील. अजित पवार गट देखील निवडणुकीच्या तयारी असल्याने महायुतीत धुसफूस होण्याची चिन्हं आहेत.
Ajit Pawar, Rohit Pawar and Ram Shinde
Ajit Pawar, Rohit Pawar and Ram Shindesarkarnama

Ajit Pawar, Rohit Pawar and BJP : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मताधिक्याला धक्का लावत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने मताधिक्य मिळवले. भापजचे मताधिक्य घटले असले तरी, महायुतीत विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची गर्दी आहे.

राष्ट्रवादी शरद पवार पक्षात मात्र आमदार रोहित पवार यांचीच पाॅवर असेल. असे असले तरी, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने देखील मतदारसंघावर दावा केला आहे. कर्जत-जामखेडमध्ये आघाडी आणि युतीत काही झाले तरी, अजित पवार किंगमेकरच्या भूमिकेत राहणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत भाजप (BJP) उमेदवार सुजय विखे यांना 2019 मध्ये कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून 24 हजारांचे मताधिक्य होते. यावेळी मात्र राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार नीलेश लंके यांना नऊ हजार मतांचे मताधिक्य मिळाले. भाजपचे मताधिक्य घटले असले, विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडेच गर्दी असणार आहे. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ गेली 25 वर्षे भाजपच्या ताब्यात होत्या.2019 मध्ये रोहित पवार यांच्या रुपात राष्ट्रवादी काँग्रेसने तिथे परिवर्तन घडवले.

Ajit Pawar, Rohit Pawar and Ram Shinde
Shivaji Kardile : शिवाजी कर्डिलेंनी आखला 'सगेसोयऱ्यांचा' राजकीय पटल; अजितदादांचं मिळणार बळ?

राम शिंदे पराभूत झाले. यानंतर मतदारसंघातून भाजप अदृश्य झाली. राम शिंदे यांना यानंतर विधानपरिषदेवर संधी देण्यात आली. राम शिंदे विधानपरिषदेवर गेले असले तरी, ते विधानसभेसाठी चाचपणी करत आहेत. तेच उमेदवार राहतील अशी चिन्हे आहेत. याशिवाय महायुतीत असलेला राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार गटाकडून मतदारसंघावर दावा कायम ठेवला आहे. त्यांच्याकडून जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मंजुषा गुंड आणि त्यांचे पती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेंद्र गुंड इच्छुक आहे.

याशिवाय महायुतीत इतर इच्छुकांची संख्या वेगळीच आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले प्रवीण घुले यांना विधानसभेचा शब्द दिल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्यांची काय भूमिका राहणार याकडे लक्ष आहे. जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, परमवीर पांडुळे, प्रवीण घुले हे देखील महायुतीकडून इच्छुक आहेत.

Ajit Pawar, Rohit Pawar and Ram Shinde
Vivek Kolhe CM Eknath Shinde : विवेक कोल्हे छापेमारीवरून संतापले; मुख्यमंत्री शिंदेंची 'प्रवृत्ती' थोपवणार असल्याचे सुनावले

महाविकास आघाडीकडून आमदार रोहित पवार हेच उमेदवार असतील, असे निश्चित आहे. त्यामुळे या बलाढ्य उमेदवारासमोर पक्षातील इच्छुकांनी तलवारी म्यान केलेल्या दिसत आहेत. नामदेव राऊत, दत्तात्रय वारे, मधुकर राळेभात, सूर्यकांत मोरे यांनी आपल्या तलवारी म्यान केल्या आहेत.

पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी 2014 मध्ये पक्षाकडून निवडणूक लढली होती. त्यावेळी त्यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. यानंतर त्यांनी निवडणूक न लढता शरद पवारसाहेबांसाठी काम करत राहण्याचा निर्धार केला. या निर्धारानुसार त्यांनी 2024 ला शरद पवार यांना नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून खासदार दिला. शरद पवार आणि आमदार रोहित पवार आता राजेंद्र फाळके यांना कसे बळ देतात, याकडे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com