Nashik Teacher Constituency : नाशिक शिक्षक विधान परिषदेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी छाप्यानंतरची पहिली प्रतिक्रिया समोर आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारी यंत्रणांचा वापर करून 'त्या प्रवृती'ला बळ देत आहेत.
सरकारी यंत्रणांचा कुठेतरी दुरुपयोग होत आहेत. काळ वाईट आहे पण, वारसा संघर्षांचा आहे, हे आमच्याबाबत मुख्यमंत्री आणि त्यांच्याभोवती असलेली 'ती प्रवृत्ती' विसरलेली दिसते, असे खणखणीत इशारा विवेक कोल्हे यांनी यांनी दिला आहे.
नाशिक (Nashik) शिक्षक विधान परिषदेच्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्या सहकारी आणि शैक्षणिक संस्थेवर राज्य सरकारच्या शिक्षण विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापेमारी केली. तीन, सात आणि 11 तारखेला पथकातील अधिकाऱ्यांनी 16-16 तास चौकशी केली. कागदपत्रांची चौकशी केली. या चौकशीत सरकारला आणि त्यांच्या पथकाला छाप्यात काय सापडले त्यानांच माहिती. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार किशोर दराडे 'प्रवृत्ती'ला बळ देत आहेत, असा आरोप विवेक कोल्हे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना केला.
विवेक कोल्हे म्हणाले, "कोल्हे परिवाराच्या असलेल्या सहकार आणि शैक्षणिक संस्थावर अशी छापेमारी पहिल्यादांचा झाली. पूर्वी एकदा कधीतरी युती सरकारच्या काळात झाली होती. त्यावेळेस देखील पथकाला काही सापडलं नाही आणि आता देखील काहीच होणार नाही निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी हे दबावाचे राजकारण आहे. कोठेतरी सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग होत आहे. मी 'टीव्ही'वर छाप्यांच्या बातम्या पाहिल्या होत्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सरकारच्या काळात छापा काय असतो तो प्रत्यक्षात अनुभवला". पण मुख्यमंत्री 'त्या प्रवृत्ती'ला बळ देत आहेत. याच 'प्रवृत्ती'च्या विरोधात मी शिक्षकांबरोबर उभा आहेत. यांचे खुनाच्या गुन्ह्यात नाव होते. यांच्या साथीदारांना शिक्षा झाली. यांचे नाव वगळले. शिक्षकांच्या जमिनी हडपल्या आहेत. अशा 'प्रवृत्ती'ला बळ देण्यासाठी मला त्रास देत असाल तर, माझा वारसा संघर्षाचा आहे, हे देखील लक्षात ठेवावे, असा खणखणीत इशारा विवेक कोल्हे यांनी दिला.
नाशिक शिक्षक विधानपरिषदेची निवडणूक सुरू झाल्यापासून समोरची 'ती प्रवृत्ती' उफाळून येत आहे. अपक्ष उमेदवाराला मारहाण झाली. डांबून ठेवण्यात आले. पोलिसांनी देखील बघ्याची भूमिका घेतली. पोलिस संरक्षणात त्या उमेदवाराला घरी सोडणे गरजेचे होते. पण त्याला विजय करंजकर आणि भाऊ चौधरी वाहनांमध्ये दिले.
हा उमेदवार दोन-चार दिवस कोठे होता? कोणत्या 'प्रवृत्ती'च्या ताब्यात होता? उमेदवार अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी आला आणि अर्ज माघार घेतला. सहा वर्षात 'ही प्रवृत्ती' कोणी समोर आणली नाही. पण ज्ञानदानाचे कार्य करणारे शिक्षक, अशा प्रवृत्तीला वैतागलेत. याच शिक्षकांच्या समर्थनाने 'ही प्रवृत्ती' आता समोर आणण्यात यश येत आहे, असेही विवेक कोल्हे यांनी म्हटले आहे.
विवेक कोल्हे यांनी त्यांच्या संस्थांवरील छाप्यानंतर थेट प्रतिक्रिया दिल्याने त्यावर काय प्रतिक्रिया उमटतात, याकडे देखील आता राज्याचे विशेष करून नाशिक शिक्षक मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.