अमळनेर मतदारसंघात यंदा तिरंगी लढत् झाली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून विद्यमान मंत्री अनिल पाटील मैदानात होते. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसकडून डॉ. अनिल शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली होती. माजी आमदार शिरीष चौधरी हे अपक्ष उमेदवार असल्याने या मतदारसंघात काट्याची टक्कर झाली. त्यांच्यासह 12 उमेदवार शर्यतीत होते. अनिल पाटील हे विजयी झाले आहेत. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results LIVE)
अनिल पाटील यांना 1 लाख 9 हजार ४४५ मते मिळाली असून 33 हजार 435 मतांनी विजय झाला आहे. तर शिरीष चौधरी यांना 76 हजार १० मते मिळाली आहेत. तर काँग्रेसचे अनिल शिंदे यांना 13 हजार 798 मते मिळाली आहेत.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर अनिल पाटील यांनी निवडणूक जिंकली होती. त्यांनी अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांचा पराभव केला होता. त्यांना भाजपने पाठिंबा दिला होता.
अनिल पाटील यांना ९३,७५७ मते मिळाली, तर शिरीष चौधरी यांना ८५,१६३ मते मिळाली. अमळनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि जनता पक्षाला यापूर्वी संधी मिळाली आहे. १९९५ ते २००४ पर्यंत हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात होता. त्यानंतर दोन वेळा याठिकाणी अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अनिल भाईदास पाटील हे विद्यमान आमदार आहेत
अमळनेर विधानसभा क्षेत्रात जातीय समीकरण देखील महत्त्वाचा घटक आहे. या क्षेत्रात ४०% मतदार पाटील समाजाचे आहेत. त्यानंतर भील आणि मुस्लिम समाजाच्या मतदारांची संख्या आहे. मुस्लिम आणि भील समाजाचे मतदान १० टक्के आहे. पाटील समाजाचे मतदान येथे निर्णायक ठरते. पाटील समाजाच्या उमेदवार अनेक वेळा निवडून आला आहे. अनेक वेळा विजय मिळवताना पाहिले आहे.
2019 मध्ये अनिल पाटील यांनी भाजपचे शिरीष चौधरी यांचा 8 हजार 594 मतांनी पराभव केला होता. अनिल पाटलांनी केलेली विविध विकासकामे ही त्यांची जमेची बाजू होती. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट आणि स्थानिक पक्ष संघटनेच्या विभाजनामुळे त्यांना आव्हानांचा सामना करावा लागला. भाजपचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवार म्हणून अनिल पाटलांसमोर आव्हान उभे केले होते. जळगाव जिल्ह्यातील 11 पैकी 6 मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरी झाली होती.
अनिल पाटील (राष्ट्रवादी):- १ लाख ९ हजार ४४५
शिरीष चौधरी (अपक्ष):- ७६ हजार १०
डॉ.अनिल शिंदे (काँग्रेस) :- १३७९८
अनिल भाईदास पाटील विजयी..
मताधिक्य :- ३३४३५
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.