Narendra Dabholkar Murder Case : दाभोलकर हत्येप्रकरणी 'ही' मोठी अपडेट; तपास पूर्ण अन् लवकरच सीबीआय...

High Court Hearing on Dabholkar Murder Case : ३२ पैकी १५ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली..
Dr. Narendra Dabholkar
Dr. Narendra Dabholkar Sarkarnama
Published on
Updated on

Dr. Narendra Modi Murder Case : अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे डाँ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सोमवारी( दि. ३० ) उच्च न्यायालयात सुनावणी झाली. ही सुनावणी न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर पार पडली. सीबीआयकडून उच्च न्यायालयात सीबीआयने तपास पूर्ण झाला असून ३२ पैकी १५ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. तसेच या हत्येप्रकरणाचा अहवाल दिल्लीतील सीबीआय मुख्यालयात पाठवला असून तीन आठवड्यांत सीबीआय आपली भूमिका स्पष्ट करणार आहे अशी माहिती समोर आली आहे.

Dr. Narendra Dabholkar
Sharad Pawar News : पवारांनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट; राष्ट्रवादी खासदारावरील निलंबन मागे घेण्याची केली विनंती

डॉ. नरेंद्र दाभोलकरांची (Narendra Dabholkar) 20 ऑगस्ट 2013 मध्ये पुण्यात हत्या करण्यात आली होती. दाभोलकर हत्या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाची देखरेख आवश्यक आहे, अशी विनंती दाभोलकर कुटुंबियांनी उच्च न्यायालयाकडे केली आहे. याप्रकऱणी सीबीआयनं दाखल केलेल्या आरोपपत्रावर सध्या पुणे सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात आरोपींविरोधात खटला सुरू आहे.

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी सीबीआयच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर अनिल सिंग म्हणाले, डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. ३२ पैकी १५ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. याप्रकरणी आणखी तपास करण्याची गरज नाही. दिल्लीतील सीबीआय मुख्यालयात तपासाचा अहवाल पाठवण्यात आला आहे. यावर तीन आठवड्यांत सीबीआय आपला निर्णय जाहीर करणार आहे.

Dr. Narendra Dabholkar
Uddhav Thackeray News : ठाकरेंचा पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ संपला; पुढे काय? घटनातज्ज्ञांनी स्पष्टच सांगितले

आरोपी शरद कळसकर आणि विक्रम भावे यांनी याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले असून उच्च न्यायालयाने तपासावर आता देखरेख ठेवू नये अशी मागणी केली होती. यावर दाभोलकर हत्या प्रकरणातील काही आरोपी अद्यापही फरार असून हत्येसाठी वापरलेली दुचाकी आणि हत्यार सापडलेले नाही. हत्येचं कारण समोर आलेलं नसून, सूत्रधाराचा शोध लागला नाही. त्यामुळे याप्रकरणात उच्च न्यायालयाची देखरेख आवश्यक आहे असा युक्तिवाद दाभोलकर कुटुंबियांचे वकील अभय नेवगी यांनी केला आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाची देखरेख आवश्यक आहे, अशी विनंती दाभोळकर कुटुंबियांनी उच्च न्यायालयाकडे केली आहे. तसेच आरोपींची याचिका फेटाळून लावण्याची मागणी देखील हायकोर्टाकडे दाभोळकर कुटुंबियांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com