Prakash Ambedkar News : औरंगजेबवरुन राजकारण करणाऱ्यांना आंबेडकरांनी ठणकावलं ; म्हणाले...

State Government : औरंगजेबाचे स्टेटस ठेवणे कोणत्या कायद्यानुसार गुन्हा?
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Prakash Ambedkar on Devendra Fadnavis : गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी दंगलसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. एका आठवड्यातच अहमदनगर जिल्ह्यानंतर कोल्हापूर येथे दोन गटात राडा झाला. दगडफेकीत अनेक जण जखमी झाले. या राड्याला औरंगजेबांचे फोटो आणि व्हॉट्सअपचे स्टेटस जबाबदार ठरले. त्या स्टेटसमध्ये औरंगजेब यांच्या फोटोसह काही मजकूर होता. मात्र बादशहा औरंगजेबच्या मुद्यावरुन मुस्लीमांना बॅकफूटवर जाण्याची अजिबात आवश्यकता नसल्याचे वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टच सांगितले. (Latest Marathi News)

Prakash Ambedkar
Amit Saha Nanded Rally : शिंदेकडे दुर्लक्ष, फडणवीसांचे कौतुक अन् ठाकरेंवर राग काढत शहांनी फोडला प्रचाराचा नारळ..

नाशिकमध्ये आंबेडकर यांनी शुक्रवारी (ता. ९) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एखाद्या राजाचा गौरव करणे यात काही गैर नसल्याचे सांगितले. आंबेडकर म्हणाले, "देशात अनेक राजांच्या कार्याचा गौरव होतो. त्यांचे उदात्तीकरण होते. त्यामुळे बादशहा औरंगजेब यांच्या कार्याचा गौरव होणे किंवा त्यांचे उदात्तीकरण होणे यात चूक काहीच नाही. त्यामुळे औरंगजेबाचे स्टेटस ठेवणे कोणत्या कायद्यानुसार गुन्हा आहे."

औरंगजेबवरुन राजकारण करणाऱ्यांना प्रकाश आंबेडकर यांनी ठणकावले. ते म्हणाले, "औरंगजेब याच मातीत जन्मला आहे. खरे तर हे वाक्य मुस्लीम नेत्यांकडून यायला हवे होते. मुस्लीम वकिलांनी पोलिसांना विचारणा करावी की, महाराणा प्रताप याचे स्टेटस कोणी ठेवले तर गुन्हा ठरतो का? राणी चन्नम्मा यांचे किंवा अहिल्यादेवी होळकर यांचे स्टेटस ठेवले तर गुन्हा ठरतो का? मग औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्याने गुन्हा कसा?" आंबेडकरांच्या या विधानांमुळे नाव वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Prakash Ambedkar
Sharad Pawar News : राहुल नार्वेकरांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले; क्रांतीकारी निर्णयानंतर...

दरम्यान, फोटो आणि स्टेटसवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी असे स्टेटस ठेवणाऱ्यांना इशारा दिला होता. या इशाऱ्यावरून आंबेडकर यांनी फडणवीस यांना सुनावले. आंबेडकर म्हणाले, "औरंगजेब या मातीतला आहे. औरंगजेब कुठून पैदा झाला असे विचारत आहेत, दुसरीकडे कुठे पैदा झाला असेल तर ते देवेंद्र फडणवीसांनी सांगावे. बादशहा औरंगजेब या मातीतला होता. या मातीतच (खुलताबाद शरीफ येथे) त्याचे दफन झाले. आम्हीही या मातीतलेच आहोत आणि या मातीतच दफन होणार."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com