Amit Thackrey: अमित ठाकरेंकडून मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा पत्ता कट

अमित ठाकरेंनी नव्या पदाधिकाऱ्यांना मोबाईल क्रमांक देत संपर्कात राहण्याचे केले आवाहन.
Amit Thackrey
Amit ThackreySarkarnama
Published on
Updated on

नाशिक : राज्याच्या (Maharashtra) राजकारणात (Politics) संपूर्ण ताकदीनिशी उभे राहण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (MNS) अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackrey) मैदानात उतरले आहे. राज्याच्या आतापर्यंतच्या राजकारणाचा विचार करता नेता व तळातल्या कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांचा संबंध न ठेवता थेट संवादाचे सुत्र स्विकारलेआहे. मनसे विद्यार्थी सेनेच्या (Students) जवळपास चार हजार सदस्यांशी संपर्क साधताना त्यांनी थेट मोबाईल क्रमांक देऊन चर्चा करण्याचे आवाहन केले.(Amit Thackrey communicate with students in Nashik)

Amit Thackrey
Vinod Tawade : मी दिल्लीत आनंदी; राज्याच्या राजकारणात नसल्याची अजिबात खंत नाही!

मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे गेल्या चार दिवसांपासून नाशिकच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात त्यांनी तालुकानिहाय महाविद्यालयांमध्ये पोचून विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राजकीय कारकिर्दीच्या प्रारंभाचा वारसा अमित यांनी चालविल्याने महाविद्यालयांमधून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. अमित यांच्या महासंवाद यात्रेचा मंगळवारी (ता.९) शेवटचा दिवस होता. यानिमित्त पक्षाच्या राजगड कार्यालयात महासंवाद मेळावा झाला. ४० विद्यार्थ्यांचा एक गट याप्रमाणे अमित ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या गटाशी संवाद साधला. संवादात विद्यार्थ्यांना महाविद्यालयात भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. सामाजिक स्तरावर विद्यार्थ्यांचे काय परिस्थिती आहे, याचाही आढावा घेतला. अमित ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना थेट मोबाईल क्रमांक देऊन संवाद साधण्याचे आवाहन केले.

Amit Thackrey
Congress: देशाचा खरा इतिहास पुसू देऊ नका!

या वेळी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. रतनकुमार ईचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर, समन्वयक सचिन भोसले, मनविसेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भंवर व गणेश मोरे, जिल्हाध्यक्ष श्याम गोहाड व कौशल पाटील, शहराध्यक्ष संदेश जगताप व ललित वाघ, मनविसे विभाग अध्यक्ष अविनाश जाधव, मेघराज नवले, सिद्धेश सानप, अक्षय गवळी, सार्थक देशपांडे, गणेश शेजूळ, मयूर रावळे आदी उपस्थित होते.

मनसेचा सक्षम पर्याय

राज ठाकरे यांच्या विकासाभिमुख राजकारणाकडे आजचा तरुण वर्ग आकर्षित होत असून, मनसेच्या रूपाने राज्याच्या राजकारणात तरुणांना एक सक्षम पर्याय उपलब्ध असल्याचे अमित ठाकरे यांनी सांगितले. या वेळी विद्यार्थ्यांना थेट संवाद साधण्याचे आवाहन त्यांनी केले. मनसेत विद्यार्थ्यांना भवितव्य आहे. सक्षम देश बनण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन केले. आठवडाभरात विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे नवीन जबाबदारी येणार असून, लवकरच मुंबईत पाचारण केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com