Trible issues meeting news : आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांपासून लाभार्थींना वंचित ठेवले जात असेल, तर मलाच उपोषणाला बसावे लागेल. कर्मचारी, अधिकारी सरकारचा पगार घेत असतील, तर त्यांनी किमान भान ठेवावे. असे खडे बोल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सुनावले. (Centre minister Dr. Bharti Pawar taken review of trible schemes)
उंबरठाण (Nashik) येथे झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी कळवण (Kalwan) प्रकल्प (Trible) कार्यालयाच्या कामकाजावर केंद्रीय राज्य मंत्री भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांनी ताशेरे ओढले. उपजिल्हाधिकारी रवींद्र परदेशी, अपर आयुक्त संदीप गोलाईत, कळवणचे सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, तहसिलदार सचिन मुळीक, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते आदी यावेळी उपस्थित होते.
सर्वप्रथम आरोग्य विभागाचा आढावा घेण्यात आला. या वेळी नागरिकांनी आरोग्य विषयक समस्यांचा पाढाच डॉ. पवार यांच्या पुढे वाचला. तसेच, तालुक्यातील ६६ वाडी वस्ती अद्याप वीज पुरवठ्यापासून वंचित आहेत. जूने विजेचे खांब बदलण्याची मागणी नागरिकांनी केली. कळवण प्रकल्प कार्यालयांतर्गत मागील वर्षीच्या अर्थसंकल्पातील १७ हजार ७१६ शिष्यवृत्तीधारकांपैकी दोन हजार विद्यार्थी अद्यापही वंचित आहेत. यावर डॉ. सौ. पवार चांगल्याच संतापल्या. या विषयावर त्यांनी जवळपास अर्धा तास चर्चा केली.
भरत भोये यांनी महिला बचतगटांना अनुदान देण्याची मागणी केली. शबरी आवास योजनेची सुरगाणा तालुक्यात १ हजार ५३, तर कळवण तालुक्यात ८५३ घरे मंजुर आहेत. खुंटविहिर शासकीय आश्रम शाळेतील रेन हार्वेस्टिंग प्रकल्प धुळखात पडून असल्याचे आनंदा झिरवाळ यांनी सांगितले. शांताराम महाले यांनी पांगारणे येथे शिक्षक देण्याची मागणी केली.
जलजीवन मिशनच्या पाणी पुरवठा योजनेविषयीही चर्चा झाली. वादळामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश या वेळी देण्यात आले. दरम्यान, या दौऱ्यात डॉ. पवार यांच्या हस्ते सुरगाणा फिल्ड रुग्णालयाचे उद्घाटन, भोरमाळ, अंबाठा, काठीपाडा, उंबरठा प्राथमिक आरोग्य केंद्रांचे भूमिपूजन झाले. रात्री उशिरा त्यांनी खोकरी, निंबारपाडा येथे घरांच्या नुकसानीची पाहणी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.