Dy. Collector Transfers : मध्यरात्री झाल्या ८२ उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या!

नाशिक विभागातील वरिष्ठ उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात खांदेपालट
Nashik collector Office
Nashik collector OfficeSarkarnama

Dy collectors transfer news : राज्यातील ८२ उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्याचे आदेश चक्क मध्यरात्री निघाले. अर्थात आज ते कार्यालयात पोहोचले. यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील अठरा उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. नाशिकचे निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांची जागेवर धुळे येथील राजेंद्र वाघ यांची बदली झाली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी, पुरवठा अधिकाऱ्यांसह भूसंपादन अधिकाऱ्यांचा बदली झालेल्यांत समावेश आहे. (Resident dy, collectors of Nashik transfer)

नाशिक (Nashik) विभागातील पाचही जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी (Collectors) कार्यालयांतील वरिष्ठ उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय व महसूल (Revenue) अधिकाऱ्यांत खांदेपालट झाली आहे. त्यातून प्रशासनाला नवा चेहरा मिळणार आहे.

Nashik collector Office
Nashik APMC news : देविदास पिंगळे यांच्या विरोधात दिनकर पाटील एकटे पडले?

नाशिकचे निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांच्या जागी धुळे येथील भूसंपादन अधिकारी राजेंद्र वाघ यांची बदली झाली आहे. अरविंद नसरीकर यांची नगरला महसूल उपजिल्हाधिकारी पदावर बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर धुळे येथील पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ बदलून येणार आहे.

नाशिकचे पुनर्वसन उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांची धुळ्यात रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. भूसंपादन उपजिल्हाधिकारी वासंती माळी यांची नाशिकला वन जमाबंदी आधिकारी पदावर बदली झाली आहे. नगरच्या पुरवठा आधिकारी जयश्री माळी यांची जळगावला भूसंपादन उपजिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. जळगावचे भूसंपादन आधिकारी किरण सावंत यांची श्रीरामपूरला उपविभागीय अधिकारी म्हणून बदली झाली आहे.

Nashik collector Office
Shivsena news : शंभर युवा नेत्यांचा उद्धव ठाकरे शिवसेनेत प्रवेश!

निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांची नगरला निवडणूक उपजिल्हाधिकारी पदावर बदली झाली आहे. तर नगरचे निवडणूक उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील यांची भुसवाळला उपविभागीय अधिकारी म्हणून बदली झाली. अमळनेर येथील उपविभागीय अधिकारी सिमा आहिरे यांची नाशिकला भूसंपादन उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ यांच्या जागेवर बदली झाली आहे.

धुळे येतील महसूल उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांची निफाडला उपविभागीय अधिकारी म्हणून बदली झाली आहे. धुळे येथील निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांची जळगावला पुरवठा अधिकारी म्हणून बदली झाली आहे. नंदुरबारचे जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांची धुळे येथे जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून बदली झाली. नंदुरबारचे उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे यांची नगरला जिल्हा पुनर्वसन अधिकारी पदावर बदली झाली आहे.

Nashik collector Office
Dhule APMC News: काँग्रेसच्या कुणाल पाटील यांच्यापुढे भाजप नेत्यांची सत्वपरीक्षा

इतर विभागात बदल्या

त्र्यंबकेश्वरचे उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण यांची पालघरला पुर्नवसन उपजिल्हाधिकारी तर संदीप निचित यांची मुंबईला उपजिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. नगरच्या उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांची श्रीवर्धन (जि. रायगड) येथे उपविभागीय अधिकारी म्हणून बदली झाली आहे. नगरच्या भूसंपादन अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांची माण-खटाव (जि. सातारा) येथे विभागीय अधिकारी पदावर बदली झाली आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, गणेश मिसाळ, श्रीमती अर्चना पठारे, अनिल पवार, सुनील सुर्यवंशी, गोविंद दानेज, श्रीमती पल्लवी निर्मळ यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित होणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com