Dhule Cash Controversy : धुळे कॅश प्रकरणातील रक्कम लंपास केली, अनिल गोटेंचा गंभीर आरोप; तुकाराम मुंडेंचे नाव घेत म्हणाले...

Anil Gote Tukaram Munde : धुळे कॅश प्रकरणात अनिल गोटे यांनी राज्याच्या सबंध यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले. म्हणाले मी जिल्हा पोलीस प्रमुखांना फोन केला. ते म्हणाले मी दहा मिनिटात येतो. दहा तास झाले तरी ते तिकडे फिरकले नाही.
Dhude Cash Controversy
Dhude Cash Controversysarkarnama
Published on
Updated on

Anil Gote News : धुळे विश्रामगृहत अंदाज समितीच्या सदस्यांना वाटप करण्यासाठी तब्बल पाच कोटी रुपये ठेवल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला होता. गोटे पैसे ठेवलेली खोली देखील सील केली होती. पोलिसांनी आणि अधिकाऱ्यांनी या विश्रामगृहात तपासणी करत पैसे जप्त केले. मात्र, ही रक्कम एक कोटी 84 लाख असल्याचे समोर आले. आहे. मात्र, विश्रामगृहाच्या कक्षात पाच कोटी रुपये होते, यावर अनिल गोटे ठाम आहेत. ही रक्कम लंपास करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. सरकारी अधिकाऱ्यांवर आपला विश्वास नसल्याचा गंभीर आरोप गोटे यांनी केला आहे.

धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात दौऱ्यावर आलेल्या विधिमंडळ अंदाज समितीचा दौरा वादात सापडला आहे. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार व समितीचे प्रमुख अर्जुन खोतकर हे देखील अडचणीत आले आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीची घोषणा केली आहे.

या संदर्भात हे प्रकरण उघडकीस आणणारे माजी आमदार अनिल गोटे यांनी मात्र गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांवर त्यांनी अविश्वास व्यक्त केला. या प्रकरणाचा तपास तुकाराम मुंढे अथवा नाशिकचे विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांनी करावा. त्यात राहुल रेखावार या सनदी अधिकाऱ्याचा समावेश करावा, असे ते म्हणाले.

दरम्यान आमदार अर्जुन खोतकर यांचे कक्ष अधिकारी पाटील किशोर पाटील यांच्या कक्ष क्रमांक 102 मधून 1.84 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत पैसे मोजण्याचे काम सुरू होते. त्यासाठी एसआरपी पेट्रोल पंपाचे नोटा मोजण्याचे यंत्र आणण्यात आले होते. आमदार खोतकर यांनी हा समितीला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. विश्रामगृहावर सापडलेल्या पैशांचा आपला काहीही संबंध नाही असा दावा केला आहे.

शासकीय यंत्रणांवर दबाव?

याबाबत अनिल गोटे यांनी राज्याच्या सबंध यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले. म्हणाले मी जिल्हा पोलीस प्रमुखांना फोन केला. ते म्हणाले मी दहा मिनिटात येतो. दहा तास झाले तरी ते तिकडे फिरकले नाही. जिल्ह्यातील सबंध शासकीय यंत्रणा गायब झाली होती. यातून त्यांच्यावर किती मोठा दबाव असेल हे स्पष्ट होते.

राज्याचे पोलीस प्रमुख, पोलीस महासंचालक, मुख्य सचिव अशा अनेक अधिकाऱ्यांना फोन केला. काहीही प्रतिसाद मिळाला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्यावर एका अधिकाऱ्याने फोन घेतला. दहा मिनिटांत फोन करायला सांगतो असे ते म्हणाले होते. अद्याप मुख्यमंत्री अथवा कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांचा फोन आलेला नाही. यावरून हे प्रकरण दडपण्याचा त्यांचा प्रयत्न असेल हे उघड होते, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

प्रामाणिक अधिकाऱ्याच्या मार्फत चौकशी करा

विधिमंडळ अंदाज समिती आणि या समितीला वाटण्यासाठी पैसे आले, असा गंभीर आरोप माजी आमदार गोटे यांनी केला आहे. त्यावर ते ठाम आहेत. एसआयटी चौकशीतून काय निष्पन्न होईल याबाबतही त्यांना शंका वाटते. त्यामुळे या प्रकरणाचा तपास प्रामाणिक अधिकाऱ्यांमार्फत झाला पाहिजे, असा आग्रह त्यांनी केला.

माजी आमदार गोटे यांनी गुलमोहर शासकीय विश्रामगृहात कक्ष क्रमांक 102 मध्ये सकाळपासून आपला कार्यकर्ता पाळतीवर ठेवला होता. त्याच्या सतत संपर्कात ते होते. सायंकाळी स्वतः गोटे या विश्रामगृहावर दाखल झाले. तेव्हापासून धुळे जिल्ह्यातील पोलिस आणि महसूल यंत्रणा अस्वस्थ झाली आहे. त्यामुळे हे प्रकरण आता कोणते वळण घेते याची उत्सुकता आहे.

Dhude Cash Controversy
Nilesh Chavan : वैष्णवी हगवणेचं बाळ ताब्यात ठेवणाऱ्या निलेश चव्हाण विरोधातही अखेर गुन्हा दाखल!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com