Nilesh Chavan : वैष्णवी हगवणेचं बाळ ताब्यात ठेवणाऱ्या निलेश चव्हाण विरोधातही अखेर गुन्हा दाखल!

FIR against Nilesh Chavan : वैष्णवीचा पती शशांक हगवणे याचा बिझनेस पार्टनर निलेश चव्हाण हाही आमच्यावर दादागिरी करायचा, असेही मयुरी हगवणे यांनी सांगितलेले आहे.
Pune police register a case against Nilesh Chavan at Warje Police Station for allegedly retaining custody of Vaishnavi Hagwane’s child.
Pune police register a case against Nilesh Chavan at Warje Police Station for allegedly retaining custody of Vaishnavi Hagwane’s child. sarkarnama
Published on
Updated on

FIR Filed Against Nilesh Chavan in Pune : पुण्यातच नव्हे तर राज्यभर गाजत असलेल्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आज आणखी एक घडामोड घडली आहे. वैष्णवीचं तान्ह बाळ तिच्या माहेरच्यांना बंदुकीचा धाक दाखवून देण्यास नकार देणाऱ्या नीलेश चव्हाण विरोधात अखेर पुण्यातील वारेज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेला आहे.

राजेंद्र हगवणे यांची मोठ्या सुनेने देखील हगवणे कुटुंबियांच्या अमानुष छळाची माहिती माध्यमांना दिली आहे. वैष्णवीच्या जाऊ मयुरी हगवणे हिने प्रसारमाध्यमांशी बोलताना हगवणे कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत.  वैष्णवीचा पती शशांक हगवणे याचा बिजनेस पार्टनर निलेश चव्हाण हाही आमच्यावर दादागिरी करायचा, असेही मयुरी हगवणे यांनी सांगितलेले आहे.

निलेश चव्हाण हा पुण्यातील कर्वेनगर भागातील औदुंबर सोसायटीत राहायला आहे. वैष्णवीच्या मृत्युंनंतर तिचे बाळ घेण्यासाठी कस्पटे कुटुंबं चव्हाणच्या घरी गेले होते. तेव्हा त्याने त्यांना बंदुकीचा धाक दाखवला. " तुमचा अन् आणि बाळाचा काही संबंध नाही, बाळाचा ताबा हवा असेल तर कोर्टात जा, असे म्हणून त्याने बंदूक दाखवल्याने कस्पटे कुटुंबीय तेथून निघून गेले होते.

Pune police register a case against Nilesh Chavan at Warje Police Station for allegedly retaining custody of Vaishnavi Hagwane’s child.
Vaishnavi Hagwane Baby : वैष्णवीचे बाळ आले आजोबांच्या कुशीत; अज्ञात व्यक्तीचा फोन अन् हायवेवर फिल्मीस्टाईलने ताबा...

अखेर आज एका अज्ञात व्यक्तीमार्फत हे बाळ वैष्णवीच्या वडिलांकडे म्हणजेच कस्पटेंकडे पोहचले. वैष्णवीच्या वडिलांनी सांगितले की एका अज्ञान व्यक्तीने हे बाळ आम्हाला आणून दिले. बाळ परत आल्याने आमची वैष्णवीच परत आल्याची आमच्या भावना आहेत.

Pune police register a case against Nilesh Chavan at Warje Police Station for allegedly retaining custody of Vaishnavi Hagwane’s child.
Vaishnavi Hagavne : हगवणेंच्या सुनांवर निलेश चव्हाणचीही दादागिरी...बाळही होते त्याच्याकडेच; मोठ्या सुनेनं सांगितली छळाची कहाणी

मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवीचे बाळ आणण्यासाठी भूकूमला चालले होते. मात्र त्यावेळी त्यांना अज्ञान व्यक्तीने फोन करून बाळ देण्यासाठी येत असल्याचे सांगितले. हायवेवर भेट घेत अज्ञात व्यक्तीने वैष्णवीचे बाळ ताब्यात दिले. दरम्यान हे बाळ वैष्णवीच्या वडिलांकडे देण्याची जबाबदारी अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन महिला नेत्यांकडे दिला होता. आता बाळ देण्यास नकार देणाऱ्या निलशे चव्हाण विरोधातही गुन्हा दाखल झाल्याने, कस्पटे कुटुंबीयांना जरा तरी दिलासा मिळाला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com