
Dhule corruption case : धुळे सरकारी विश्रामगृहातून तब्बल 1 कोटी 84 लाख रुपयांच्या जप्त रकमेवर महायुती सरकारच्या गृह विभागाकडून होत असलेल्या कारवाईवर आपलं बारीक लक्ष असून, अजून आठवडा भर लक्ष ठेवून आहोत.
त्यानंतर शांत बसणार नाही, असा अल्टीमेटम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे माजी आमदार अनिल गोटे यांनी दिला आहे.
शिवसेना ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाचे माजी आमदार अनिल गोटे म्हणाले, "धुळे इथल्या सरकारच्या विश्रामगृहातून जप्त करण्यात आलेल्या रोख रकमेत अद्यापत महायुती सरकारच्या गृह विभागातर्फे समाधानकारक कारवाई नाही". "हे कायद्याचं सरकार नव्हे, तर स्वतःचा फायदा करून घेणार सरकार आहे, असा टोला लगावला.
अंदाज समितीच्या बैठकीसाठी आलेल्या 12ही आमदारांना सहआरोपी जोपर्यंत केले जात नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. अजून आठ ते दहा दिवस मी गृह विभागाच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून असेल, आणि समाधानकारक कारवाई न झाल्यास, मी मुंबई (Mumbai) उच्च न्यायालयामध्ये या विरोधात याचिका दाखल करेल, असा अल्टीमेटम अनिल गोटे यांनी दिला.
गेल्या महिन्यामध्ये धुळे इथल्या सरकारी विश्रामगृहाच्या खोली क्रमांक 102 मध्ये जवळपास 1 कोटी 84 लाख 84 हजार रुपयांची रोकड पोलिसांना मिळून आली होती. यानंतर एकच खळबळ उडाली. वेगवेगळ्या चर्चांना तोंड फुटल्यानंतर माजी आमदार अनिल गोटे यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू केला. या प्रकरणात सर्व 12 आमदारांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आपण हे प्रकरण अशाच प्रकारे उचलून धरणार असल्याचे गोटे यांनी स्पष्ट केले.
धुळे इथल्या सरकारी गुलमोहर विश्रामगृहाच्या खोली क्रमांक 102 मध्ये तब्बल 1 कोटी 84 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. धुळे पोलिस याप्रकरणी कारवाई करत आहे. रोकड जप्त करण्यात आल्यानंतर विधिमंडळाचे संशयित कक्ष अधिकारी किशोर पाटील यांना निलंबित करण्यात आलं. तसेच विधिमंडळाकडून चौकशी समितीचीही स्थापना करण्यात आली आहे.
समितीतील आमदारांना पैसे देण्यासाठीच अधिकाऱ्यांनी हे पैसे जमा केल्याचा अनिल गोटे यांचा आरोप आहे. 102 ही खोली किशोर पाटील यांच्या नावावर बुक होती. किशोर पाटील हे अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांचे खासगी पीए आहेत. शिवसैनिकांनी खोलीतील पैशांची माहिती मिळताच आणि तिथं धडक देताच खोतकरांचे पीए यांनी खोलीला कुलूप लावून पळ काढला होता, असा आरोप देखील अनिल गोटे यांनी त्यावेळी केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.