Suspended API escapes hospital : उपअधीक्षक संदीप मिटकेंवर गोळीबार करणारा बडतर्फ पुण्याच्या अधिकाऱ्याचे पलायन; पोलिसांना गाफिलपणा भोवला

Dismissed API Sunil Lokhande Escapes from Ahilaynagar Hospital After Firing on DYSP : महिला अत्याचारासह पोलिस उपअधीक्षकांवर गोळीबार प्रकरणात अटकेत असलेला बडतर्फ सहायक पोलिस निरीक्षकाचे रुग्णालयातून पळून गेला आहे.
Suspended API escapes hospital
Suspended API escapes hospitalSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra police crime news : अत्याचार आणि तत्कालीन पोलिस उपअधीक्षकांवर गोळीबार केल्याप्रकरणी अटकेत असलेला बडतर्फ सहायक पोलिस निरीक्षक पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला.

सुनील लक्ष्मण लोखंडे (वय 52, रा. वानवडी, पुणे) असे त्याचे नाव असून, पुणे पोलिस दलात सहायक निरीक्षक पदावर तो कार्यरत होता. दरम्यान, आरोपीने पोलिसांच्या ताब्यातून पलायन केल्याने

सुनील लोखंडेला न्यायालयीन कोठडीतून उपचारासाठी अहिल्यानगर जिल्हा सरकारी रुग्णालयात (Hospital) हलवण्यात आले होते. तेथे स्वतंत्र कोठडीत ठेवले असताना वैद्यकीय तपासणीसाठी सर्जिकल वॉर्डमध्ये नेण्यात आले. तेव्हा बंदोबस्तासाठी नेमलेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना गुंगारा देऊन लोखंडेने पळ काढला, अशी माहिती पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांनी दिली.

पोलिस (Police) अंमलदार संजय वाघमारे यांच्या फिर्यादीनुसार या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लोखंडेच्या शोधासाठी तोफखाना पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेची पथके रवाना करण्यात आली आहेत.

Suspended API escapes hospital
ACB Navi Mumbai raid : वरिष्ठ पोलिस निरीक्षकाकडे पगारी उत्पन्नापेक्षा तब्बल 300 पट संपत्ती...

यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन 2021 मध्ये एका महिलेने लोखंडेविरुद्ध अत्याचाराची तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान पीडित महिलेला आणि तिच्या दोन मुलींना घरी जाऊन रिव्हॉल्वरचा धाक दाखवत धमकावण्यासाठी लोखंडे त्यांच्या घरी गेला व त्यांना घरात ओलीस ठेवण्याचा प्रयत्न केला.

Suspended API escapes hospital
Prataprao Dhakne BJP : शरद पवारांचे निष्ठावान 'काका' अन् बावनकुळे एकाच व्यासपीठावर; आमदार राजळे नाराजीच्या चर्चांना फुटलं तोंड...

संदीप मिटकेंवर गोळीबार...

या घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूरचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोचले. त्यावेळी लोखंडेने हवेत गोळीबार करून दहशत निर्माण केली. मिटके आणि लोखंडे यांच्यात झटापट झाली. सुनील लोखंडे याने झाडलेली उपअधीक्षक मिटके यांनी शिताफीने चुकवली. या संदर्भात स्वतंत्र गुन्हा राहुरी पोलीस ठाण्यात दाखल करून लोखंडेला अटक करण्यात आली होती.

पोलिस अधीक्षकांकडून गंभीर दखल

आरोपीने पलायन केल्याच्या घटनेची गंभीर दखल जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी घेतली. पोलिस मुख्यालयातील अंमलदार संजय किसन वाघमारे आणि योगेश यशवंत दायजे या दोघांना कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत निलंबित केले. या दोघा पोलिसांना लोखंडे उपचार घेत असलेल्या ठिकाणी बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com