Anil Kadam Politics: माजी आमदार अनिल कदम यांचा दावा; अजित पवार यांच्या 'त्या' ऑफरने बदलले असते निफाडचे राजकारण?

Ajit Pawar Offer Changed Niphad Politics: शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी आमदार अनिल कदम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत केला गौप्यस्फोट.
Dilip Bankar & Anil Kadam
Dilip Bankar & Anil KadamSarkarnama
Published on
Updated on

Anil Kadam News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचा निफाड विधानसभा मतदारसंघावर विशेष प्रभाव आहे. त्यांचे हे राजकारण वारंवार प्रकट झाले आहे. राजकारणाला छेद देण्यासाठी अजित पवार यांनी विधानसभेत वेगळ्याच डाव आखला होता, अशी चर्चा आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने महाविकास आघाडीची उमेदवारी माजी आमदार अनिल कदम यांना दिली होती. निफाड मतदार संघात कदम विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार दिलीप बनकर अशी लढत झाली होती. यामध्ये माजी आमदार कदम पराभूत झाले.

यासंदर्भात माजी आमदार कदम यांनी नुकताच एक गव्यस्फोट केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला अजित पवार यांनी आपल्याला भेटीसाठी निरोप दिला होता. त्यावेळी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीची ऑफर आपल्याला होती, असा दावा कदम यांनी केला.

Dilip Bankar & Anil Kadam
Balasaheb Thorat on Manoj Jarange : OBC आरक्षणाला धक्का नकोच, पण..; समितीसाठी अनुभवी कोणी, हे सांगताना थोरातांचा महायुतीला सल्ला!

माजी आमदार कदम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची `ती` ऑफर स्वीकारली असती तर निफाड मतदार संघाचे राजकारण पूर्णता बदलले असते, असे सुचक वक्तव्य केले आहे. कदाचीत आमदार दिलीप बनकर यांच्याऐवजी पवार यांच्या डोळ्यापुढे माजी आमदार कदम यांचा पर्याय होता का? याची चर्चा सुरू आहे.

निफाड मतदार संघात माजी आमदार कदम आणि त्यांच्याच कुटुंबातील व सध्या भाजपवासी झालेले यतीन कदम यांच्यात राजकीय भाऊबंदकी तीव्र आहे. त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीवर सातत्याने होत आला आहे. गत् निवडणुकीतही यतीन कदम यांनी उमेदवारीसाठी शेवटपर्यंत आमदार दिलीप बनकर यांच्या मार्गात अडसर निर्माण केला होता.

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या ऑफरची कुणकुण लागल्यानेच यतीन कदम यांनी निफाड मतदार संघ भाजपकडे राहावा यासाठी प्रयत्न केले होते. यतीन कदम हे देखील विधानसभा निवडणुकीत इच्छुक होते. यतीन कदम यांची उमेदवारी गेल्या निवडणुकीत दिलीप बनकर यांना फायद्याची ठरली होती.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मात्र ती कोणाच्या पथ्यावर पडणार याबाबत गोंधळ होता. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या तीन कदम यांची समजूत घालून त्यांना माघार घेण्यास भाग पाडले होते. या सर्व राजकारणाची उजळणी माजी आमदार कदम यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे पुन्हा एकदा होत आहे.

अर्थात माजी आमदार कदम यांनी केलेल्या विधानाने आणि प्रत्यक्ष राजकारण यामध्ये मोठे अंतर आहे. पण तालुक्यातील जर तर च्या राजकारणामुळे अनेक निवडणुकांमध्ये ऐनवेळी वारे फिरल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार दिलीप बनकर यांना उमेदवारी देण्याचा निर्णय विचारपूर्वकच घेतला, हेच खरे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com