Anil Kadam Politics: उद्धव ठाकरेंनी अनिल कदम यांच्या मर्मावरच बोट ठेवले, उमेदवारीत भाऊबंदकीचा अडसर?

What Decision Will Anil Kadam Take Due to Uddhav Thackeray's Hints: कदम कुटुंबातील भाऊबंदकी विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला अडचणीत आणणार?
Yatin Kadam & Anil Kadam
Yatin Kadam & Anil KadamSarkarnama
Published on
Updated on

Niphad Constituency News: भाऊबंदकी अनेकांच्या प्रगतीला मारक ठरते. निफाड विधानसभा निवडणुकीच्या राजकारणातही त्याचे प्रतिबिंब दिसते आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीची पुनरावृत्ती झाल्यास ठाकरे गटाची अडचण होण्याची चिन्हे आहेत.

जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांचा आढावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गुरुवारी झाला. मुंबईत झालेल्या या बैठकीत प्रत्येक मतदारसंघाच्या राजकीय स्थितीचा तपशील ठाकरे यांनी घेतला. मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीपेक्षा उद्धव ठाकरे यांच्याकडे अधिक माहिती असल्याचे या बैठकीत दिसले.

त्यामुळे या बैठकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांची चांगलीच अडचण झाली. सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला, तो निफाड विधानसभा मतदारसंघाचा. या मतदारसंघात गेल्या निवडणुकीत ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल कदम यांचा पराभव झाला होता.

या पराभवाला प्रामुख्याने त्यांचे चुलत बंधू यतीन कदम यांची उमेदवारी कारणीभूत ठरली होती. यातीन कदम यांच्या उमेदवारीने मतविभागणी झाली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप बनकर हे विजयी झाले होते.

Yatin Kadam & Anil Kadam
NCP Ajit Pawar: बॅनर बदलल्याने प्रदेशाध्यक्षांसमोरच कार्यकर्त्यांचा घोषणा देत संताप!

यंदाच्या निवडणुकीत जागावाटप आणि उमेदवारी यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांत मोठी चुरस आहे. तिसऱ्या आघाडीने प्रहार पक्षातर्फे गुरुदेव कांदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे ही उमेदवारी कोणाला झटका देणार, हा सध्या चर्चेचा विषय आहे.

निफाडमध्ये भाऊबंदकीचा फटका शिवसेना ठाकरे पक्षाला बसू नये यासाठी पक्ष अतिशय सावध आहे. त्यामुळे माजी आमदार कदम यांना उमेदवारी देण्याआधी भाऊबंदकी मिटवा, असा सल्ला ठाकरे यांनी दिला आहे. त्याला मोठा अर्थ आहे.

कदम कुटूंबातील ही भाऊबंदकी मिटविणे माजी आमदार कदम यांच्या क्षमते बाहेरचा विषय असल्याचे लपून राहिलेले नाही. यतीन कदम आणि अनिल कदम यांच्यात समेट घडविण्याचा प्रयत्न अनेक नेत्यांनी यापूर्वी केला आहे. त्यात कोणालाही यश आले नाही.

Yatin Kadam & Anil Kadam
Narhari Zirwal Politics: झिरवळपुत्राचा संशयकल्लोळ; म्हणे, पक्षाने लढ म्हटले तरच वडिलांविरुद्ध दंड थोपटणार!

समेट न होण्याचे प्रमुख कारण म्हणजे यतीन कदम आणि अनिल कदम यापैकी कोण दोन पावले मागे जाणार, काय तोडगा मान्य होणार, याचे उत्तर नाही असे आहे.

गेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी केलेल्या यतीन कदम सध्या भारतीय जनता पक्षात आहेत. त्यांनी भाजप कडे अधिकृत उमेदवारी मागितली आहे. गेल्या निवडणुकीत एकट्याने लढलेल्या कदम यांना यंदा भाजपच्या जुन्या जाणत्या मंडळींची ही साथ मिळणार आहे.

निफाड तालुक्यात भाजपची शक्ती मर्यादित असली, तरीही भाजप एक प्रमुख राजकीय घटक आहे. भाजपची सर्व मंडळी एकत्र आल्यास यतीन कदम यांना बळ मिळणार आहे. या अपेक्षेमुळेच यंदा यतीन कदम माघार घेण्याच्या मनस्थितीत नाहीत.

कोणते कदम निवडणुकीतून माघार घेणार, त्यासाठी कोण पुढाकार घेणार, हा गंभीर प्रश्न आहे. यतीन कदम यांच्या मातोश्री मंदाकिनी कदम तसेच वडील (कै) रावसाहेब कदम हे शिवसेनेचे माजी आमदार होत.

त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याकडे शब्द टाकला तर त्याचा उपयोग होईल का ही सध्या निफाडच्या राजकारणातील प्रमुख बाब आहे. माजी आमदार कदम यांची ही अडचण उद्धव ठाकरे यांनी हेरली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com