Trupti Desai politics: धक्कादायक, तक्रार करणारी महिलाच बनली गुरुमाऊलींची ढाल, काय आहे कारण?

Annasaheb more; Tripti Desai's allegation, This is the withdrawal of the woman who complained-सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि संभाजी ब्रिगेडने संदर्भात तक्रार दिलेल्या महिलेची अचानक माघार चर्चेत
Annasaheb More & Trupti Desai
Annasaheb More & Trupti DesaiSarkarnama
Published on
Updated on

Annasaheb More News: मस्साजोग (बीड) गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चर्चा सुरूच आहे. या संदर्भात संशयित वाल्मीक कराड याचे स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख अण्णासाहेब मोरे यांच्याशी संबंध जोडण्याचा प्रयत्न झाला होता.

सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी संशयीत वाल्मीक कराड आणि त्याचा साथीदार हे नाशिकच्या स्वामी समर्थ केंद्रात मुक्कामी होते, असा आरोप केला होता. त्याचबरोबर त्यांनी काही महिलांचे शोषण अण्णासाहेब मोरे यांनी केले असेही सांगितले होते. याच आरोपांना अनुसरून संभाजी ब्रिगेडने ही अण्णासाहेब मोरे यांच्याविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली होती.

Annasaheb More & Trupti Desai
Girish Mahajan politics: गिरीश महाजनांच्या मार्गात आता शिंदे सेनेचा स्पीडब्रेकर!

मात्र आता या प्रकरणाला पुन्हा एकदा नाट्यमय वळण मिळाले आहे. संभाजी ब्रिगेडने सारिका सोनवणे या महिलेचे शोषण झाल्याची तक्रार आपल्याकडे आल्याचे म्हटले होते. पोलिसांकडेही तशी तक्रार केल्याचा त्यांचा दावा होता. त्याचवेळी अण्णासाहेब मोरे हे देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीचे `आका` असल्याचा दावा देखील केला होता. मात्र आता संभाजी ब्रिगेडच अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.

Annasaheb More & Trupti Desai
Advay Hiray Vs Dada Bhuse : अद्वय हिरेंना दादा भुसेंचा पुन्हा धक्का, खेचून आणली सत्ता!

या संदर्भात सारिका सोनवणे या महिलेने पोलिसांत तसेच प्रतिज्ञापत्राद्वारे तक्रार केली होती. आपले मानसिक व शारीरिक छळ अण्णासाहेब मोरे यांनी केली, अशी त्यांची तक्रार होती. मात्र आता श्रीमती सोनवणे यांनी अचानक यू टर्न घेतला आहे. त्यामुळे त्यांचा हा यू टर्न चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.

आपण दबावापोटी तशी तक्रार केली होती, असे श्रीमती सोनवणे यांनी सांगितले आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई किंवा संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी यांच्याकडे कोणतीही तक्रार केली नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. माझी व मोरे कुटुंबीयांच्या बदनामीचे षडयंत्र रचण्यात आले आहे, असा दावाही त्यांनी केल्याचे कळते.

यानिमित्ताने श्रीमती सोनवणे यांच्याबाबत २०२३ मध्ये नाशिक शहर पोलिसात दाखल असलेल्या गुन्ह्यालाही उजाळा मिळाला आहे. श्रीमती सोनवणे तसेच तिचा मुलगा आणि भाऊ यांच्या विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात स्वामी समर्थ केंद्राच्या विश्वस्ताकडून खंडणी मागितल्याची तक्रार दाखल आहे. एकंदरच आता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला वेगळ्याच वळणाने नेण्याचा हा प्रयत्न तर नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com