Advay Hiray Vs Dada Bhuse : अद्वय हिरेंना दादा भुसेंचा पुन्हा धक्का, खेचून आणली सत्ता!

Advay Hiray Vs Dada Bhuse Malegaon Market Committee : बाजार समितीवर तब्बल 15 वर्ष भुसे गटाची सत्ता होती मात्र मागील निवडणुकीत हिरे यांच्या गटाने 18 पैकी 14 जागांवर विजय मिळवत सत्ता आपल्याकडे खेचून आणली होती.
Adway Hiray and Dada Bhuse
Adway Hiray and Dada BhuseSarkarnama
Published on
Updated on

Advay Hiray Vs Dada Bhuse : विधानसभा निवडणुकीत दादा भुसे विरुद्ध अद्वय हिरे यांच्यातील लढत ही काटे की टक्कर होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, मालेगाव बाह्य मतदारसंघात झालेली ही लढत एकतर्फी झाली. तब्बल दीड लाखांपेक्षा अधिक मताधिक्क्याने दादा भुसे यांनी अद्वय हिरे यांचा पराभव केला. या पराभवाला तीन महिने पूर्ण होण्या आधीच भुसेंना पुन्हा एकदा अद्वय हिरेंना धक्का दिला आहे.

मालेगाव बाजार समिती ही नाशिक जिल्ह्यात प्रतिष्ठित मानली जाते. या समितीची सत्ता हिरेंकडे होती. मात्र, हिरे यांच्याकडील सत्ता दादा भुसे यांनी खेचून आणली आहे. समितीच्या सभापतीमधी एकनाथ शिंदेंच्या सभापतीपदी चंद्रकांत शेवाळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर, अरुण सोनजकर यांची उपसभापतीपदी निवड झाली आहे.

Adway Hiray and Dada Bhuse
Nana Patole on MVA : महाविकास आघाडीत बिघाडी अन् काँग्रेस एकाकी? ; नाना पटोलेंने स्पष्टच सांगितलं, म्हणाले....

हिरे यांची सत्ता संपुष्टात आणून दादा भुसे यांनी आपल्या करिष्मा विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा दाखवून दिला. बाजार समितीवर तब्बल 15 वर्ष भुसे गटाची सत्ता होती मात्र मागील निवडणुकीत हिरे यांच्या गटाने 18 पैकी 14 जागांवर विजय मिळवत सत्ता आपल्याकडे खेचून आणली होती. मात्र यावेळी भुसेंनी हिरेंना जोरदार धक्का दिला.

अशी आणली सत्ता

अद्वय हिरेंचे सहा समर्थक हे निवडणुकीच्या आधी दादा भुसेंच्या गटात सामील झाले होते. तसेच बाजार समितीच्या कार्यकाळात मासिक सर्वसाधारण सभांना गैरहजर समितीचे तत्कालीन सभापती अद्वय हिरे यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. यानंतर आज (सोमवारी) सभापती आणि उपसभापतीपदाची निवडणूक पार पडली. त्यात 18 पैकी तब्बल 14 संचालक भुसे गटात आल्याने सत्ता परिवर्तन झाले.

Adway Hiray and Dada Bhuse
Mamata Banerjee on Sanjay Roy Punishment : संजय रॉयला सुनावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेवर ममता बॅनर्जी समाधानी नाहीत, म्हणाल्या...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com